स्वर्गिय वर्गमित्राच्या कन्येच्या विवाहासाठी वाटसअप ग्रुप च्या माध्यमातून मित्रांचे अनमोल योगदान

 स्वर्गिय वर्गमित्राच्या कन्येच्या विवाहासाठी वाटसअप ग्रुप च्या माध्यमातून मित्रांचे अनमोल योगदान







धानोरा ( शेख हमजान ) -

सोशल मिडीया हे एक क्रांतीकारी समाज माध्यम सिद्ध होते मात्र ते हाताळताना विधायक पद्धतीने व सेवाभावी वृत्तीने त्याचा वापर झाला पाहिजे . जनता विद्यालय धानोरा येथे शिक्षण घेतलेल्या १९८८ च्या इ . १० वी बॅचच्या वर्ग मित्रांनी वाट्स अप ग्रुप च्या माध्यमातुन आपले वर्गमित्र स्वर्गीय गणपत राठोड यांच्या मुलीच्या लग्नासाठी आपणही मोलाच योगदान दिले पाहीजे या उद्देशाने ग्रुप वरील वर्ग मित्रांनी पैसे गोळा केले व लग्नाच्या मंडपात सर्व मित्र परिवाराने ही जमा झालेली रक्कम वधू च्या मातेकडे सुपूर्द केली . 



  भवानी नगर तांडा , वाघळूज येथील रहिवाशी गणपत राठोड चे अकाली अपघाती निधन झाले . मात्र त्याच्या मुलीचे लग्न 3 सप्टेंबर 2023 रोजी ठरले . याबाबत त्याच्या मित्रपरिवाराच्या ग्रुपमध्ये चर्चा झाली . ग्रुपवर कुणीतरी गणपतच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका पाठवली व  सर्वांनी लग्नात यावे हि विनंती केली. त्यानंतर मित्राच्या मुलीच्या लग्नात प्रत्येकाचे आर्थिक सहकार्य लाभावे म्हणून सर्व वर्ग मित्रांनी आपआपल्या कुवतीनुसार रक्कम जमा केली . व जमा झालेली एकुण ३५ हजार ६६० रु . लग्न मंडपात वधूच्या मातेच्या सूपूर्द करण्यात आली . यावेळी त्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू आले .

 या प्रसंगी मळुदेव चव्हाण ,पाराजी बर्डै ,संजय उदावंत ' विक्रम चव्हाण ,तन्वीर राजे , उषाताई आडकर , सदु जाठोत ,परमेश्वर राठोड ,नारायण बनसोडे ,रामदास तरटे ,कुंडलीक चव्हाण ,खतिज्याताई शेख ,अशोक चौधरी ,डाॅ उमर शेख ,सुनिल काळपुंड ,सोनाजी घोडके ,रोहिदास राठोड ,सविता गर्जे ,वर्षा गाडे ,सुरेश म राठोड ,सिताराम चव्हाण ,सुनिता कापसे ,आलमगिर शेख ,परमेश्वर बोन्द्रे ,अजिनाथ चव्हाण ,बापुराव शेळके ,गोवर्धन लगड ,दिपक मुरूमकर ,खालेद सय्यद , महादेव अडागळे , बजरंग एकशिंगे सर्व मित्रांनी वाटसअप ग्रुप च्या माध्यमातून पैसे जमा करून एकुण रक्कम  ३५६६० रुपये जमा करून दिल्याने त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे समाजातील सुज्ञ नागरीकां कडून स्वागत होत आहे . वर्ग मित्राच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटूंबियांच्या मागे खंबीरपणे उभे राहुन आधार देणाऱ्या या सर्व मित्र परिवाराचे तेजवार्ता न्युज नेटवर्क तर्फे हार्दिक अभिनंदन !

------------------------------------









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.