मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज कडा येथे एक तास चक्काजाम..!
----------------------------------------
संदिप जाधव/आष्टी
जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी आज कडा आष्टी,धानोरा चिंचपूर व धामणगाव अशा विविध शहरांमध्ये चक्काचाम आंदोलन करण्यात आले होते.
आज कडा येथे दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात या आंदोलनाला सुरुवात झाली होती.
जवळपास एक तास चक्काचाम आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनात फक्त मराठा समाजच नव्हता तर सर्व जाती धर्माचे बांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.व या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिलतात्या ढोबळे, संदिप खाकाळ, डॉ महेश नाथ,रविकाका ढोबळे, डॉ माधव चौधरी,ठकाराम दुधावडे,दिपक गरुड, बिपीन भंडारी,संजय ढोबळे,सागर ढोबळे,राजू शिंदे,बबलु आखाडे, अशोक ढवण, बाळासाहेब कर्डीले,नागेश कर्डीले, छगन कर्डीले, दिपक कर्डीले,जयंत खंदारे सह सर्व कडा शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकल मराठा समाजाची मागणी आहे की,सर्व समाजाला शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण मिळावे.व कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.व ते ही भारतीय राज्य घटनेच्या चौकटीत अशा विविध मागण्यांचे निवेदन महसूल विभागाचे अधिकारी,तलाठी जगन्नाथ राऊत व मंडळ अधिकारी देवधरे यांना देण्यात आले.
यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपनिरीक्षक देशमुख साहेब यांच्या सह अनेक पोलिस बांधव उपस्थित होते.
जालना येथे झालेल्या अमानुषपणे अत्याचाराच्या विरोधात व मराठा समाजास 'कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीचे समर्थनार्थ आंतरवली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथील मनोज जरांगे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जनआंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्ह्याच्या वतीने आज रोजी 'चक्का जाम आंदोलन' करून आंदोलनास
समर्थन देण्यात येत आहे.
मागण्या पुढीलप्रमाणे..
१) मराठा समाजास "कुणबी मराठा" असे प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढून मराठा समाजास न्याय द्यावा,
२)आंतरवली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे दि.१ सप्टेंबर रोजी पोलीस प्रशासनाकडून झालेल्या अमानुष लाठीचार्ज / अत्याचार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
३) पोलीसांकडून झालेल्या माता-भगिणींवरील लाठीचार्ज व अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोग, मानवाधिकार आयोग यांच्या मार्फत चौकशी होऊन, दोपी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
४) मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलना संदर्भातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे तसेच दि. १ सप्टेंबर रोजीच्या आंतरवली सराटी, ता. अंबड, जि. जालना घटने संदर्भातील दाखल झालेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
अशा विविध मागण्यांचे ही निवेदन देण्यात आले.
stay connected