कमलेश उज्जैनवाल यांची उल्हासनगर आरपीआय युवा शहराध्यक्षपदी नियुक्ती

 कमलेश उज्जैनवाल यांची उल्हासनगर आरपीआय युवा शहराध्यक्षपदी नियुक्ती



उल्हासनगर  दि:- उल्हासनगर शहरातील आरपीआय युवा उपाध्यक्ष कमलेश उज्जैनवाल यांची उल्हासनगर आरपीआय युवा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 कमल उज्जैनवाल हे उल्हासनगर मधील तरुण तडफदार युवक पदाधिकारी म्हणून अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत लॉकडाऊन च्या काळामध्ये गरजूंना सर्व प्रकारची मदत तसेच पूरग्रस्तांना मदत आरपीआय युवा शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सवाच्या आयोजन त्यांच्याकडून कामगार हॉस्पिटल उल्हासनगर तीन समोर धुमधडाक्यात साजरा केला जातो तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये समाज उपयोगी कार्यक्रमाद्वारे विविध कार्यक्रम हे त्यांच्यामार्फत घेतले जातात त्यांच्या या कामाच्या योगदानामुळे त्यांच्याकडे आरपीआय उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी त्यांच्यावर आर पी  आय उल्हासनगर शहर जिल्हा युवक अध्यक्षपदी निवड केली आहे त्यांच्या या निवडीमुळे उल्हासनगर शहरातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

यावेळी दादू थोरात, रोहन कांबळे, आकाश सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने  उपस्थित होते








Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.