शिक्षक दिन
चिमुकल्यांना घडवणारे तुम्ही
समाजाचाचे हित पाहणारे
सुजान पिढी घडवुनी करता
योग्य दिशा दाखवणारे
हात हातात घेऊन तुम्ही
मुळाक्षरे गिरवुन घेता
आनंददायी बालगीत गाऊनी
मुलांमध्ये रममान होता
कधी खडु फळा घेऊनी
कधी टॅब घेतला हाती
ऑनलाईन शिक्षण देऊनी
तंत्रज्ञानातुन ज्ञानाच्या ज्योती
उत्तम संस्कार करुनी तुम्ही
घडवले सुजान नागरीक
देशाच्या हितासाठी आपण
प्रत्येक कार्यात जागरुक
समाजासाठी सतत चांगले कार्य
नेहमी करण्याचा ध्यास तुमचा
शाळा हेच मंदिर मानुनी
आयुष्यभर विद्यादान करता
आज शिक्षक दिनाच्या तुम्हाला
आम्ही मनापासून वंदन करतो
तुमच्या कार्याला सलाम करुनी
भावी कार्यास शुभेच्छा देतो
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
stay connected