भारतीय मराठा संघ उल्हासनगर शहर प्रमुख सुनिल विजय साळुंके यांनी केला मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज चा निषेध
उल्हासनगर :-जालना जिल्यातील आंतरवली - सराटी येथे शांततापूर्ण आमरण उपोषण करणा-या मराठा बांधवांवर झालेल्या अमाणुष लाठीमार आणि अत्यचाराचा निषेध करण्याबाबत चे निवेदन उल्हासनगर तहसिलदार यांना भारतीय मराठा संघ उल्हासनगर शहर प्रमुख सुनिल विजय साळुंके कडून देण्यात आले.
मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अतिशय शांततापूर्वक आमरण उपोषण मागील चार दिवसापासुन चालु होते, पोलीसांनी या उपोषण कर्त्यांवर अचाणक
राक्षसी वापर केला गेला सदरच्या पोलीस मारहाणीत महिला वृध्द व लहान बालकांना गंभीर इजा झालेल्या आहेत. सदरच्या उपोषणामुळे सरकारला भारती निर्माण झाल्यामुळे नियोजनबध्द पध्दतीने पोलीस बळ वापरले गेले मागील सात वर्षापूर्वी कोपर्डी अत्याचारानंतर तब्बल ५७ मराठा कांती मोर्चे महाराष्ट्रभर कावले गेले ते मोर्चे शांततेत पार पडले होते कोणतेही गालबोट लागले नव्हते मग जालना येथील उपोषणाची सरकारला कुठल्या प्रकारची भिती वाटत होती.
यासाठी मराठा मोर्चा उल्हासनगर च्या वतिने सदरच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व बेजबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी व उपोषण कर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठि उल्हासनगर तहसिलदार यांना निवदन देण्यात आले.
यावेळी अविनाश पवार संस्थापक अध्यक्ष भारतिय मराठा संघ महाडिक,उपाध्यक्ष दिपक पालांडे,राज महाडिक,अरुण कणसे सुनिता गव्हाणे,भीमसेन मोरे आदि उपस्थित होते.
stay connected