जिम्नॅस्टिकस या ऑलम्पिक खेळाच्या विकासासाठी राज्य संघटनेने विशेष लक्ष्य केंद्रित करावे - दुर्गराज एन रामटेके ( चंद्रपुर जिल्हा सचिव)
महाराष्ट्र अमेचुर जिम्नॅस्टिकस असोसिएशनचे अध्यक्ष मा. संजय शेट्टे सर यांना विनंती
----------------------------------------------------
अमरावती - 05/09/2023
*चंद्रपुर जिल्ह्यात जिम्नॅस्टिकस हॉल,जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपुर शिवाय इतर तालुक्यात जिम्नॅस्टिकस क्रीडा प्रकारचे साहित्य नसल्याने, ती खुप खुप महागडी असल्याने राज्यात इतर जिल्ह्या च्या तुलनेत चंद्रपुर जिल्हात राष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण करणे कठीण होते आहे. सर्वच तालुक्यात जवळपास तालुका क्रीडा संकुल अस्तित्वात आलेले आहेत पण सध्या एकाही तालुका क्रीडा संकुल मध्ये बेसिक जिम्नॅस्टिकस साहित्य नसल्याने जिल्ह्यातील होतकरू ग्रामीण व शहरी जिम्नॅस्टिकस खेळाळूना जिम्नॅस्टिकस क्रीडा प्रकाराचे नियमित प्रशिक्षण घेणे,सराव करणे,व राज्य - राष्ट्रीय स्पर्धा पुर्व तयारी करणे खुप खुप कठीण झालेले आहे.*
*चंद्रपुर जिल्ह्यात अनेक मेहनती व कसलेले खेळाडू आहेत,त्यांना योग्य बेसिक जिम्नॅस्टिकस साहित्य उपलब्ध करून दिल्यास अल्पावधीतच ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करू शकतात हा आमचा विश्वास आहे.*
*तेव्हा महाराष्ट्र अमेचुर जिम्नॅस्टिकस असोसिएशन द्वारा माननीय राज्य क्रीडा संचालक, व महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग याच्याशी आवश्यक पाठपुरावा करून चंद्रपुर जिल्ह्यात 1) प्रथमतः किमान वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, या 05 तालुक्यातील क्रीडा संकुल व प्रशिक्षण केंद्रावर बेसिक जिम्नॅस्टिकस साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा, 2) जिल्हा क्रीडा संकुल स्थित जिम्नॅस्टिकस हॉल मध्ये राज्य सरकार द्वारा जिम्नॅस्टिकस क्रीडा मार्गदर्शक यांची तातडीने नियुक्ती करावी, 3) राज्य जिम्नॅस्टिकस असोसिएशन द्वारा जिल्ह्यातील वरील सहा तालुका मध्ये जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण शिबिरे राबविण्यास राज्य असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक्सपर्ट कोचेस यांना किमान 01 महिने करीता नियुक्त करण्याचा प्रयत्न करावा ,*
*अशी विनंती चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुर जिम्नॅस्टिकस असोसिएशन ( रजी.नं. 249/ 2006 चंद्रपुर ) च्या वतीने महाराष्ट्र अमेचुर जिम्नॅस्टिकस असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री संजय शेट्टे सर, सचिव मा. प्रा. डॉ. मकरंद जोशी सर, कार्याध्यक्ष मा.श्री के जी जाधव सर, वरिष्ठ उपाध्यक्ष मा.श्री महेंद्र चेंबूरकर सर, कोषाध्यक्ष श्री आशिष सावंत सर यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आले.*
*महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद द्वारा मान्यताप्राप्त महाराष्ट्र अमेचुर जिम्नॅस्टिकस असोसिएशन ची विशेष आमसभा दिनांक 03 सप्टेंबर 2023 ला क्रीडा क्षेत्रातील विश्वप्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे पार पडली. सभेचे आयोजन अमरावती जिल्हा हौशी जिम्नास्टिक जिम्नास्टिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष व अमरावती जिल्हा संघटनेच्या सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेडके यांच्या सहकार्याने करण्यात आलेहोते, यावेळी राज्य असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सर्व संलग्न जिल्हा संघटनेचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.*
*चंद्रपुर जिल्हा जिम्नॅस्टिकस असोसिएशनचे अध्यक्ष श्री आशुतोष गयनेवर, कार्याध्यक्ष श्री निलेश गुंडावार, उपाध्यक्ष श्री वाल्मिक खोब्रागडे, ऍड. राजरत्न पथाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपुर जिल्हा हौशी जिम्नॅस्टिकस संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. दुष्यंत नगराळे, जिल्हा असोसिएशनचे संस्थापक सचिव दुर्गराज एन रामटेके , भद्रनाग स्पोर्ट्स अकादमी , भद्रावती चे कोच क्रिश भोस्कर प्रामुख्याने या विशेष आमसभेला चंद्रपुर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.*
stay connected