एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
दुष्काळ, नापिकी, कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या तीन शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने छत्रपती संभाजीनगर हादरले आहे. दोन शेतकऱ्यांनी विष घेऊन जीवन संपवले तर एकाने गळफास घेतला. मराठवाडय़ात पावसाने जबरदस्त ओढ दिल्याने खरिपाचा हंगाम हातचा गेला आहे. सोयाबीन, कापूस तसेच मक्यासह इतर पिके वाळून गेली असून विहिरी, तलावांनी तळ गाठल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठय़ा प्रमाणावर जाणवत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी उधार, उसनवारी करून पेरणी केली. परंतु हाती काहीच न लागल्याने हे कर्ज कसे फेडावे, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. याच विवंचनेत कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिडवे या शेतकऱ्याने रविवारी शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथे पावसाअभावी पिके वाळून गेल्याने आता पुढे काय करायचे, या वैफल्यात कारभारी माणिकराव पाटोळे (55) यांनी विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला.


stay connected