नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते भक्ताराम फड यांची माहिती

 नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन
सामाजिक कार्यकर्ते भक्ताराम फड यांची माहिती 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी  संस्थाचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी मंगळवार दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी मित्र परिवाराच्या वतिने श्री वैद्यनाथास अभिषेक व विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भक्ताराम फड व मित्र मंडळी यांनी दिली आहे.



        कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे हे स्वभावाने स्वच्छ,निर्मळ, अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे दिलखुलास व्यक्तीमत्व,शेती, शिक्षणा बरोबरच सामाजिक कार्याची प्रचंड आवड असलेले आणि सर्वांना सोबत घेऊन चालनारे व प्रत्येकाला आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व आहेत. शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असतो त्याचबरोबर प्रत्येकास प्रेमाणे वागणुक देत गोरगरिबांना व सर्वसामान्यांना वेळप्रसंगी सहकार्य मदत करणारे आधार देणारे नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी देशातील १२ पैकी एक पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या श्रीवैद्यनाथास मित्र मंडळीच्या वतीने अभिषेक व विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

       मंगळवार दि.५ सप्टेंबर रोजी कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी  संस्थाचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसनिमित्त सामाजिक कार्यकर्ते भक्ताराम फड व मित्र परिवाराच्या वतिने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदीप खाडे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी मित्र परिवाराच्या वतिने सकाळी 7 वा. प्रभू वैद्यनाथास रुद्राभिषेक, तसेच सकाळी 9 वा. वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविक भक्तांना फळ वाटप व वृक्षरोपन आमचे संगोपन तुमचे अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या सर्व सामाज उपयोगी कार्यक्रमास मित्र मंडळींनी व तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते भक्ताराम फड यांनी केले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.