विजयकुमार बांदल आण्णा यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करुन उच्च पदस्थ अधिकारी घडवले - प्राचार्य उत्तम गव्हाणे

 विजयकुमार बांदल आण्णा यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करुन उच्च पदस्थ अधिकारी घडवले - प्राचार्य उत्तम गव्हाणे







धानोरा ( सय्यद रिजवान ) - स्वर्गीय धोंडीराम बांदल दादा यांनी मोठ्या कष्टातून ग्रामीण शेतकच्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जनता वसतिगृह शिक्षण संस्थेची सुरुवात केली . व या रोपट्याचा वटवृक्ष करण्याचे काम संस्थेचे सचिव विजय कुमार बांदल आण्णा यांनी केले . या संस्थेतून अनेक उच्चपदस्थ अधिकारी तयार झाले . असे प्रतिपादन जनता कॉलेज चे प्राचार्य उत्तम गव्हाणे यांनी केले . 



दि १ सप्टेंबर रोजी धानोरा येथील जनता वसतिगृह शिक्षण संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल आण्णा यांच्या 74 व्या वाढदिवसा निमीत्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते . या प्रसगी संस्थेच्या वतिने अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई ,प्राचार्य उत्तम गव्हाणे , उपप्राचार्य कर्डिले सर , मुख्याध्यापक सय्यद युनूस सर , व्यवस्थापक विशाल बांदल , प्रा . पवार सर , प्रा सय्यद बशीर सर , प्रा . गाडे सर तसेच शेतकरी नेते शिवाजीराव सुरवसे , पांडुरंग चव्हाण , संदीप टकले , संतोष म्हस्के तसेच सर्व शिक्षक व सर्व कर्मचारी यांनी विजयकुमार आण्णा बांदल यांना शुभेच्छा दिल्या . त्याच्या वाढदिवसा निमीत्त जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले तसेच रोडेश्वर विद्यालय पिंपरखेड येथे विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले . यावेळी बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष शिवाजी सुरवसे म्हणाले कि विजयकुमार बांदल आण्णा यांचा शांत संयमी व प्रेमळ स्वभाव आहे . आपल्या ग्रामिण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सेवाकार्य समजून त्यांनी अहोरात्र कष्ट करून संस्थेचे रोपटे जगवले व या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले . या प्रसंगी माजी सरपंच बापुराव शेळके , मच्छिंद्र शेळके , माजी सरपंच पांडुरंग गायकवाड , संदीप काळे , संस्थेचे सर्व पदाधिकारी , प्राचार्य ,मुख्याध्यापक ,उपप्राचार्य ,उपमुख्याध्यापक ,सर्व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .  





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.