प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल विलेपार्लेच्या याशवी शाह व राहुल येलुरी यांची चीन मध्ये होणाऱ्या आर्टीस्टिक स्केटिंग एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
मुंबई ( नारायण सावंत जेष्ठ पत्रकार ) -
येत्या २३ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर२०२३ पासून चीन मधील हेंग झेऊ शहरात होणाऱ्या १३ व्या आर्टीस्टिक स्केटिंग एशियन गेम्स स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे संकुलाच्या याशवी शाह व राहुल येलूरी यांची निवड झाली आहे.
तसेच कुंज चोकशी - गुजरात, वाकाशा नगुला लक्ष्मी नारायण - चेन्नई, आकुलासाई सांमंता - आंध्र प्रदेश, अभिजित अमल राज- केरला, दोंत्रा ग्रिष्मा - आंध्र प्रदेश. इत्यादी भारतातील खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे.
प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ. मोहन अनंत राणे संकुलाचे प्रशिक्षक आदेश सिंग व पी. के. सिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन यशवी शाह व राहुल येरुरी यांना लाभले आहे या दोघांच्या निवडीबद्दल सर्वत्री आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
stay connected