सौताडा व मुगगाव येथील साखळी उपोषणास सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांची भेट.
पाटोदा/ प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा समाजाचे हृदयसम्राट क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांचे सराटे आंतरवाली मध्ये साखळी उपोषण चालू आहे, या उपोषणाला पाठिंबा म्हणून पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र सौताडा व मुगगाव या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने साखळी उपोषण चालू केलेले आहे. या साखळी उपोषणास शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ समाजसेवक सुरेश पाटील यांनी भेट दिली.
मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत असल्याने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे या हेतूने गेले काही दिवस जालना जिल्ह्यातील सराटे अंतरवाली या ठिकाणी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन महाराष्ट्र भर गाजले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे यांच्या आश्वासनानंतर अन्नत्याग ऐवजी साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा म्हणून सौताडा व मुगगावच्या नागरिकांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण चालू ठेवू. जर मराठा आरक्षण मिळाले नाही तर येत्या निवडणुकीमध्ये पुन्हा मराठा समाजाचे उमेदवार निवडून देणार नाहीत, असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने सुरेश पाटील यांना देण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सभापती पती काकासाहेब लांबरुड, गोवर्धन सानप उर्फ गवळी आप्पा, सौताडा गावचे सरपंच घुले, भरत शिंदे पाटील मुगगावचे माजी सरपंच बंधू संतोष खोटे, आजी ग्रामपंचायत सदस्य, माझी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक राख, पत्रकार अशोक भवर, पत्रकार संजय सानप तसेच सौताडा व मुगगावचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
stay connected