रक्तदान करून आमदार आजबे काकांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
दौलावडगाव / प्रतिनिधी..
आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आणि आक्रमक शैलीचे दबंग आमदार मा.श्री. बाळासाहेब आजबे काका यांनी यंदा मतदारसंघात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने मी कुणाचेही हार,बुके, फेटा स्विकार करणार नाही. कार्यक्रत्यानी गावातच सामाजिक उपक्रम राबवून गरजू व्यक्तींना मद्दत करावी असे आवाहन कार्यकर्त्यांना यांनी केले होते.
त्याअनुषंगाने आ.बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौलावडगाव येथिल कार्यकर्त्यांनी गावामध्येच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण व रक्तदान शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवून गरजूं व्यक्तींना मद्दत व्हावी अशी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस नव नवीन सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात.
यावर्षी आनंद ऋषी ब्लड बँक व डॉ.समीर सय्यद यांचे साई सेवा हाॅस्पिटल यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक २ सप्टेंबर २०२३ रोजी सरपंच भरत जाधव यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबीराची सुरूवात करून दिवसभरात जवळपास ६५ कार्यकर्त्यांनी रक्तदान करून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी संयोजकांनी रक्तदात्यांना फलाहार, चहा बिस्किटे असा अल्पहाराचे नियोजन केले होते.
या शिबिराला युवा नेते यश भय्या आजबे, नगरसेवक नाझीम शेख, शिवा शेकडे आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.शिबिराचे आणखी वैशिष्ट्ये म्हणजे महिलांनी सुद्धा रक्तदान करून आपल्या लाडक्या आमदाराला शुभेच्छा दिल्या.हे शिबीर पार पडण्यासाठी हरिभाऊ दहातोंडे, परशुराम मराठे, महादेव डोके, शामराव फसले, आदिनाथ फसले, बब्लु शेठ कुरैशी,सतिश कोहक , नवनाथ इथापे गोंवीद इथापे,आदी नेत्यांनी अथक परिश्रम घेऊन शिबीर यशस्वी केले.
यावेळी दौलावडगावचे सरपंच श्री भरत जाधव,विशाल झांबरे सरपंच बांधखेल,शरद दळवी सरपंच पिंपळगाव घाट, विठ्ठल नागरगोजे, शिवा शेकडे, शोकात पठ्ठाण, उपसरपंच बाळासाहेब कोहक सर,रामा दळवी,अमोल ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य महादेव कोहक, मिरा शेख, बाजीराव आडबल्ले,सेवा सोसायटी माजी चेअरमन बाबासाहेब फसले, माजी उपसरपंच छब्बूनाना फसले, लक्ष्मण दादा फसले, पप्पू गवळी, विठ्ठल आडसरे, माजी सरपंच मधूकर थोरात,संपत झेंडे,आरूण फसले, हेमंत इथापे आदी कार्यकर्ते मंडळी उपस्थित राहून शिबीर यशस्वी केले.
stay connected