लाठीमारामुळे अजितदादा नाराज, सरकारी कार्यक्रमांना दोन दिवस गैरहजर, आज मराठा आरक्षणाच्या बैठकीला हजेरी

 लाठीमारामुळे अजितदादा नाराज, सरकारी कार्यक्रमांना दोन दिवस गैरहजर, आज मराठा आरक्षणाच्या बैठकीला हजेरी




मुंबई : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलन सरकारने चिरडून टाकलं. पोलिसांनी मागेपुढे न पाहता आंदोलकांवर तुफान लाठीचार्ज केला. या घटनेने महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध मोर्चे निघतायेत. दरम्यान, सरकारमध्ये नव्याने सामिल झालेले उपमुख्यमंत्री यांनी गेल्या दोन दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतलेला नाहीये. अजित पवार यांनी सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारीही सर्व सार्वजनिक कार्यक्रम राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, सध्या हाती आलेल्या माहितीनुसार अजित पवार मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर उपस्थित झाले आहेत.जालन्यातील अंबडच्या अंतरवाली सराटी गावात शांततेत होत असलेल्या आंदोलनाला पोलिसांच्या लाठीचार्जने वेगळे वळण लागले. संपूर्ण राज्यात पोलिसांच्या आणि शासनाच्या भूमिकेवर टीका होत असताना अजितदादाही झाल्या प्रकाराने नाराज असल्याची माहिती आहे. एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांची बाजू सावरत असताना अजितदादांनी मात्र पोलीस दोषी असल्याचंच थेट फेसबुकवरून म्हणत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा शब्द राज्यातील नागरिकांना दिला.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.