बीड जिल्ह्यात सर्वत्र कमी पाऊस असतानाही काही कृषी मंडळे का वगळली - डॉ जितीन वंजारे
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कमीतकमी स्वताच्या संपूर्ण जिल्ह्याला तरी न्याय द्यावा-डॉ वंजारे
बीड प्रतिनिधी/- बीड जिल्ह्यात सर्वत्र अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाला असताना सुद्धा बीड जिल्ह्यातील काही कृषी मंडळी वगळण्यात आलेली आहेत बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे शेतकरी हवालदिल आहे सर्व ठिकाणी पीक करपून गेलेली आहेत ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी आता जरी पाणी दिलेलं असलं तरी ते शाश्वत नसून तलावातील जलसाठा पुढील वर्षासाठी पाणी पिण्यासाठी आरक्षित केला तर आलेले सध्याचे हिरवेगार पिके सुद्धा करपून जातील आणि नंतर त्यांना मदत मिळणार नाही त्यामुळे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र कृषी मंत्री सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांनी स्वतःच्या जिल्ह्याला तरी न्याय द्यावा आणि तात्काळ आग्रिम मंजूर करून संपूर्ण बीड जिल्हा विनाअट दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांनी केले आहे.
शेतातील सोयाबीन करपली आहे, कापसाने माना टाकल्या आहेत , उडीद मूग आणि तूर जळून खाक झाली आहे. खरिपाची पिके सर्वच्या सर्व वाया गेलेली आहेत शेतकऱ्यांच्या पदरी फक्त तूर आणि कापूस तोही काही प्रमाणामध्ये बरा आहे या चार-पाच दिवसांमध्ये पाऊस न आल्यास तेही पिके मान टाकीतील आणि शेतकरी उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये सर्वच कृषी मंडळी हे दुष्काळग्रस्त जाहीर करून बीड जिल्हा संपूर्ण दुष्काळग्रस्त जाहीर करून त्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावे नुसतं आग्रीम मंजूर करून भागणार नाही हे सरकार इतर ठिकाणी भरघोस प्रमाणामध्ये खर्च करताना दिसले आहे परंतु शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून भारत हा कृषिप्रधान देश आहे परंतु या देशात शेतकरी सोडून सर्वांची कीव केली जाते हेच आपलं दुर्दैव आहे.शेतकऱ्यावर सततचा अन्याय अत्याचार या राज्यकर्त्याकडून होत असतानाच यावर्षी आसमानी आणि सुलतानी संकटानी सुद्धा शेतकऱ्यांना घेरल आहे.यातून फक्त सरकारच वाचवू शकते त्यामुळे तात्काळ बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केली आहे.
stay connected