वैजापूर मर्चंटस बँकेच्या अध्यक्षपदी मा.श्री.बाळासाहेब संचेती यांची निवड, बिनविरोध जाहीर,
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :-
( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला, )
वैजापूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी, आदर्श समाजभूषण, माजी नगराध्यक्ष, रवींद्र उर्फ बाळासाहेब संचेती, तर उपाध्यक्षपदी उल्हास ठोंबरे यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली, सहायक सहकार निबंधक सुनील बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली यावेळी बँकेचे, सरव्यवस्थापक अमोल कोठारी व्यवस्थापक विलास कोरडे यांनी काम बघितले श्री संचेती व श्री ठोंबरे या दोघांचा प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यात आली, यावेळी विद्यमान संचालक, उद्योगपती, विशाल संचेती विजय वेद सौरभ संचेती मनोज छाजेड विनय सुराणा महेंद्र कुमार गुंदेचा प्रीतमचंद मुथा प्रकाश पीरथानी, विजय दायमा सावनभाऊ राजपूत, विनोद गायकवाड प्रशांत त्रिभुवन शालिनी सोमानी वैशाली साखरे यांची उपस्थिती होती निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला याप्रसंगी, जार समितीचे सभापती रामहरी जाधव, हाजी शेख अकील शेख गफूर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, डॉ. राजिव डोंगरे संजय निकम ज्ञानेश्वर जगताप भाजपा तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे वैजापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू काझी, डॉ. संतोष तोष्णीवाल पारस घाटे, मधुकर पवार, गणेश इंगळे, कल्याण जगताप, प्रवीण पवार, गोरख आहेर , ज्ञानेश्वर टेके, रय्यास चाऊस, पुरुषोत्तम जगताप, बंटी मगर, आदींसह सदस्य कार्यकर्ते, हितचिंतक मित्र परिवार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected