NCP Crisis : Sharad Pawar एकवेळ राजकारण सोडतील पण BJP सोबत जाणार नाहीत: Laxman Mane
सातारा : देशात व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागरिकांची मुस्कटदाबी सुरू केली आहे. भविष्यात हुकुमशाही आणण्याचा त्याचा प्रयत्न असून त्यांच्याबद्दल बोलणारांविरोधात केंद्रीय एजन्सींचा वापर केला जात आहे. अजित पवार समर्थकांसह भाजप सरकारमध्ये सहभागी झाले असले, तरी राजकारण सोडतील, पण भाजपमध्ये अजिबात जाणार नाहीत, असे स्पष्ट मत भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष, उपराकार यांनी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.राज्यात झालेले सत्तानाट्य हे भाजपचे यश नसून केंद्रीय यंत्रणांचे यश आहे. या यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडाफोडीचे काम सुरू असून हे लोकशाहीसाठी घातक आहे. माझ्यावर कोणतीही कारवाई करा, मी घाबरणार नसून चुकीच्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहे. मी साहित्यिक असून मला सत्य बोलले पाहिजे. राज्यातील सर्व साहित्यिकांनी सत्य बोलून मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला पाहिजे. भाजप सोडून कोणालाही मत द्या, असे आवाहन करत भाजपविरोधी पक्ष व संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन माने यांनी केले.ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे राजकारण सोडतील पण भाजपबरोबर जाणार नाहीत.


stay connected