आष्टी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा. - रवी काका ढोबळे.

 आष्टी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा. - रवी काका ढोबळे.




कडा प्रतिनिधी.



यावर्षी खरीप हंगाम २०२३/२४ मध्ये सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी आहे .

त्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या पेरलेले सोयाबीन ,उडीद ,मूग ,तूर व बाजरी इत्यादी पिके करपून गेली आहे त्यासाठी पिकांसाठी नांगरठी, पेरणी, फवारणी, खुरपणी व कोळपणी वगैरे कामे करत शेतकऱ्यांनी मोठा खर्च केलेला आहे मात्र पिके करपल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे मराठवाड्यावर दुष्काळाची सावट पसरली आहे पावसाने ताण दिल्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या व पुढे सोयाबीन पीर मोठ्या प्रमाणात झाली आहे सोयाबीन उडीद फुलणाऱ्या मध्ये असताना पावसाने खंड दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या पिकांची फुल गळती झालेली आहे परिणामी शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे तेव्हा विनंती की शेतकऱ्यांना विमा ची 25% अग्रीम रक्कम त्वरित द्यावी व मराठवाडा दुष्काळ जाहीर करावा असी मागणी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिलेले आहे.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.