राजकारणातील कृतिशील नेतृत्व आमदार बाळासाहेब आजबे

 विशेष लेख

------------------

प्रा. महेश चवरे,आष्टी.

-----------------------------


राजकारणातील कृतिशील नेतृत्व आमदार बाळासाहेब आजबे 

----------------------------------------

Balasaheb Ajbe


         भारतीय राजकारणामध्ये ग्रामीण भागातील राजकीय नेतृत्व मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजे. हा भारतीय लोकशाहीचा प्रमुख उद्देश आहे. जुन्या राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील त्यांच्या पुढच्या पिढीचे नेतृत्व तयार होणे हे देशाच्या,महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही.बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदार संघाला तर उज्ज्वल नेतृत्वाची मोठी परंपरा लाभली आहे. त्या परंपरेत कै.आ.

भाऊसाहेब आजबे होते. विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांचे वडील असलेले कै.भाऊसाहेब आजबे यांच्या आमदारकीच्या काळाचा प्रभाव हा संपूर्ण जिल्ह्यावर  होता.त्यांच्या मृत्यूनंतर आजबेंचे घर राजकारणात मागे पडले मध्यंतरीच्या काळात भाऊसाहेब आजबे यांचे तिसरे चिरंजीव आ.बाळासाहेब आजबे ज्यांना लोक  " काका "  या नावाने संबोधतात. त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करून स्वतःचे नेतृत्व विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केला. त्याकामी शिराळ या त्यांच्या गावानी त्यांना खूप साथ दिली. त्याद्वारे ते स्वतःच्या हक्काचे संघटन निर्माण करून राजकारणात स्थिर होऊ लागले, लोकांचे सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी आक्रमकपणे लढू लागले.



Happy Birthday Balasaheb Ajbe



कुठल्याही पातळीवर कार्यकर्त्याच्या मागे ठाम उभा राहू लागले.या तरुण नेत्याच्या कामाची दखल जिल्हा पातळीवर घेतली जाऊ लागली म्हणूनच लोकनेते  कै.गोपीनाथमुंडे साहेब यांनी त्यांचा भाजप पक्ष बीड जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या अडचणीत असताना काकांना आग्रहाने भाजपमध्ये प्रवेश करायला लावला  त्यानंतरच काकांची राजकीय वाटचाल ही दमदारपणे सुरू झाली,अठरा पगड जातीचे कार्यकर्ते काकांबरोबर काम करू लागले. काकांच्या नेतृत्व गुणातील कल्पकता आणि धडाडीमुळे अनेक जिवाभावाचे लोक काकासाठी आपले तन,मन,धन लावून निष्टेने काम करू लागले.

मुंडेसाहेबांसारख्या मोठ्या नेतृत्वाबरोबर काम करत असल्यामुळे काकांचे नेतृत्व सर्वार्थाने पुढे आले म्हणूनच गोपीनाथ मुंडेसाहेबांची आठवण काकांना आजही प्रत्येक प्रसंगी येते.राजकीय नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला सतत नवनवीन आव्हानाला सामोरे जावं लागतं. आष्टी मतदार संघात तर प्रस्थापित असलेल्या राजकारण्यांच्या विरोधात लढाई करून स्वतःचे नेतृत्व तयार करणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी गेली १५ वर्षे काकांनी रात्रंदिवस एक केला.

अपार कष्ट घेतले त्यामुळेच पंचायत समिती,जिल्हा परिषदेचे सदस्य ते आजचे विधानसभा सदस्य हा त्यांचा राजकीय प्रवास शक्य झाला.कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत धैर्यशील राहून सकारात्मक विचार करून कायम कृतिशील असणे हे काकांच्या राजकारणाचे मुख्य सूत्र ठरले. स्पर्धात्मक राजकारणमध्ये सत्ता मिळवून ती फक्त गाजविण्यापेक्षा प्रत्यक्ष जनहिताची कामे आपल्या कृतीतून दाखवून देणे हे काकांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.राजकारणाचा वापर स्वतःच्या स्वार्थसाठी ते कधीच करत नाहीत. ते नाही पटलं तर एक वेळेस राजकारण सोडतील पण स्वतःच्या तत्वांशी,मूल्यांशी कधी तडजोड करणार नाहीत.आज मतदार संघातील प्रत्येक प्रश्न,

अडचण सोडविण्याकडे त्यांचा कायम कल असल्याचा दिसून येतो,जे काम होतील तेच खरे आश्वासन ते जनतेला देतात किंबहुना फक्त राजकारण म्हणून जनतेला खोटे आश्वासन ते कधी देत नाहीत हा त्यांचा स्वभावच नाही.प्रत्येक घटकासाठी सहजासहजी आमदार उपलब्ध होत असल्यामुळे काकांच्या नेतृत्वाने लोकांच्या मनात घर केले आहे. एक समजूतदार आणि प्रामाणिक नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

मतदार संघात कुठेही नैसर्गीक संकट आले किंवा वैयक्तिक कुठला माणूस अडचणीत सापडला तर त्यावेळी मदतीसाठी काका लगेच हजर असतात.काका जे काम हाती घेतात त्या कामाचे दायित्व स्वीकारून ते काम जबाबदारीने पार पाडतात हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे.आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालय व उपजिल्हा न्यायालय मंजूर व्हावे यासाठी ते आज शासनाकडे विशेष प्रयत्न करत आहेत.खुंटेफळ साठवण तलाव काम मार्गी लावणे हा एकच ध्यास काकानीं घेतला आहे. त्यासाठी साधारण १५०० कोटी रुपये पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यासाठी आताच्या सरकाराकडून मंजूर करून घेतले आहेत. ज्याद्वारे  कायम दुष्काळी असणाऱ्या आष्टी तालुक्याचा निम्मा पाणी प्रश्न सुटून शेतकऱ्यांच्या जमीनी कायम बागायती होणार आहेत.आष्टी, पाटोदा, शिरूर या तीनही तालुक्यात ग्रामीण आणि शहरी भागात काकांनी सरकारच्या माध्यमातून अनेक दर्जेदार रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर मंजूर करून आणली आहेत त्यातील बरीच कामे आज पूर्ण होत आहेत.पाणी सिंचनसाठी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारेसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणला आहे.आज महाराष्ट्रात सत्तेच्या राजकारणाचा जो सारिपाठ खेळला जात आहे त्यात सुद्धा काकांनी अजितदादा पवार यांच्याबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला तो केवळ मतदार संघांचे हित डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे.सत्तेच्या आणि अजितदादांच्या माध्यमातून  विविध विकास कामे,प्रस्तावित जलप्रकल्प,वीज पुरवठा व महावितरणकडील अन्य समस्यांचे निराकारण,सद्य दुष्काळी परिस्थिती यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी काका सातत्याने प्रयत्न करत आहेत.

त्यासाठी अजितदादांनी ठोस निर्णय घेऊन मतदार संघाच्या विकासासाठी भरीव निधीची घोषणा करावी या एका अटीवरच काकांनी अजितदादा आणि  जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.सार्वजनिक धोरण राबवताना प्रशासनाला बरोबर घेऊन कसें काम करायचे याचा उत्तम आदर्श काकांनी या चार वर्षांच्या काळात दाखवून दिला त्याचा फायदा ही अनेक विभागात झालेला आज पाहायला मिळतो. दुसरे राजकीय पक्ष किंवा त्यातील नेत्यांवर टीका करण्यापेक्षा त्यांना बरोबर घेऊन आपण काय काम करू शकतोत याचा विचार ते प्राधान्याने करतात.स्वतः एक मराठा म्हणून फक्त मराठा जातीसाठी राजकारण काकांनी कधी केले नाही सर्व जात,

धर्म,पंथ,कष्टकरी,शेतकरी,व्यापारी,

नौकरदारांचे प्रश्न सोडविणे हाच उद्देश ते राजकारण करत असताना ठेवतात.विधानसभेला निवडून आल्यानंतर पहिल्याच वर्षी  त्यांनी कित्येक वर्षांपासून रेंगाळत पडलेला कुकडीचा पाणी प्रश्न शरद पवार साहेबांना विशेष प्रयत्न करून सोडवायला लावला त्यासाठी पवार साहेबांच्या दौऱ्यात  त्यांना ते धरण स्थळी घेऊन गेले होते.कुकडीचे पाणी सीना धरणातून मेहकरी धरणात आणताना ज्या  अडचणी येत होत्या त्यासाठी काका स्वतः धरण क्षेत्रात उभे राहून प्रशासनाला सूचना व मदत करताना दिसत होते,मेहकरीमध्ये आलेल्या या कुकडीच्या पाण्यामुळे आष्टी तालुक्यातील बराच भाग बारमाही बागायती होण्यासाठी मदत होणार आहे.काकांचा स्वतःचा मुख्य  व्यवसाय शेती हा असल्यामुळे शेती या क्षेत्राशी त्यांना विशेष लगावं आहे ते आजही स्वतः कुटुंबाबरोबर जाऊन शेतातील सर्व काम करतात मागे सतत पडत असणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी काकांनी ठिकठिकाणी जनावरांच्या छावण्या उभारल्या होत्या त्यांच्या एका छावणीत तर गोपीनाथ मुंडे साहेब मुक्कामाला राहिले होते ती बाब सगळ्या महाराष्ट्रात त्याकाळी गाजली होती.

     लोकशाहीमध्ये विविध मार्गांनी यशस्वी सत्ता राबविणे हे उत्तम नेतृत्वाचे खास कसब काकांच्यात जाणवते.जनसंवाद कसा ठेवावा हे काकांच्या व्यापक संपर्कातून कळतो त्यांच्या भाषणात विषयांची मुद्देसुद मांडणी,विरोधकांना सडेतोड उत्तर,कारारीपणा,

सामाजिक मार्गदर्शन दिसते. कार्यकर्ता व नेता या  दोघांना एकमेकांबद्दल मनातून वाटणारा आदर असे एकमेव नेतृत्व काकांचे आहे काकांना राजकारणात पदोपदी मोठा संघर्ष करावा लागला परंतु त्या संघर्ष काळापासून आतापर्यंत काकांच्या एक स्वतंत्र विचारांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तयार झाली आहे ते कार्यकर्ते स्वतःच्या राजकीय व आर्थिक फायद्याचा कधीही विचार करत नाहीत त्यांच्यासाठी काकांचे नेतृत्व हीच स्वाभिमानाची गोष्ट आहे.  आजबे काकांच्या रुबाबदार व्यक्तीमत्वाकडे पाहून कार्यकर्त्यांनाही उत्साही वाटते. २०१९ च्या विधानसभेला तर गावगावच्या लोकांनी वर्गणी गोळा करून काकांना आमदार केले आहे.नेतृत्व,कर्तृत्व व वक्तृत्व याच्या जोरावर स्वतःचे एक वेगळे स्थान काकांनी बीड जिल्ह्याच्या राजकारणात तयार केले आहे राजकारणातील सर्वसामान्यांच एक कायम कृतिशील असलेले आदर्श नेतृत्व म्हणून आमदार बाळासाहेब आजबे या नावाची एक अजब शक्ती बीड जिल्ह्याच्या राजकारणात नावारूपास येत आहे. आज २८ ऑगस्टला आमदार आजबे काकांचा जन्मदिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा होतो आहे.त्याच अनुषंगाने यावेळी कार्यकर्त्यांनी मतदार संघातील शेतीसाठी असलेल्या प्रधानमंत्री पीक वीमा योजने

अंतर्गत पीकविमा गावोगावी शेताकऱ्यांच्या घरी जाऊन फुकट उतरवून देत आहेत.सध्या पाऊस नाही दुष्काळी परिस्थिती दिसत आहे त्यामुळे काकानीं आपला वाढदिवस कुठलेही हार तुरे न स्वीकारता साधे पणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना आवहान केले आहे की वाढदिवसाला आनाठायी खर्च न करता लोकांची मदत करावी,रक्तदान शिबीरे, वृक्षारोपण, रुग्णसेवा,क्रीडास्पर्धा यासारखे विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन माझा वाढदिवस साजरा करावा.

    आ. बाळासाहेब आजबे यांचे नेतृत्व दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावो त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून सर्वसामान्यांची सेवा कायम घडो... ही शुभेच्छा....!!

- प्रा . महेश चौरे / आष्टी




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.