Suresh Dhas आक्रमक : सभागृहात आम्ही काय गोटया खेळायला येतो काय?
आष्टी:प्रतिनिधी
सध्या विधानपरिषद व विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे.विधानपरिषद सभागृहात आज दि. २५ रोजी कामकाज सुरू असतांना अनेक अधिकारी आणि मंत्री गैरहजर होते आ.सुरेश धस अक्रमक होत अधिकारी मंत्री जर सभागृहात येत नसतील तर आम्ही काय गोट्या खेळायला येतोत का? असा थेट सवाल सभागृहाच्या सभापतींना विचारताच सभापतींनी मंत्री येत असल्याचे सांगून वेळ मारून नेली.
गेल्या आठ दिवसापासून मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मंगळवारी सकाळी विधान परिषदेचे कामकाज सुरू असताना अनेक मंत्री आणि अधिकारी गैरहजर होते याचवेळी आमदार धस बोलण्यासाठी उभे राहिले असता सभागृहामध्ये मंत्री आणि अधिकारी हजर नसल्याचे दिसताच त्यांचा पारा चढला. आम्ही आमचे प्रश्न सांगायचे तरी कोणाला ? असा सवाल उपस्थित करत गैरहजेरी बद्दल सभापतींकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
या अधिवेशनात मराठवाड्यातील विविध प्रश्नावर आमदार सुरेश धस सत्तेत असून सुध्दा प्रश्न पोटतिडकीने आणि अक्रमकपणे मांडत आहेत.त्याचे व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल होतांना दिसून येत आहेत. आमदार सुरेश धस यांनी अधिवेशात प्रत्येकवर्षी मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्याच्या प्रश्नासाठी कॅबिनेट बैठक छञपती संभाजी नगरला घ्यावी हा मुद्दा लावून धरला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे.यावर उपाययोजना सरकारने करावी अशी अग्रणहीआहे. यावर उपाययोजना सरकारने करावी अशी अग्रणही मागणी आमदार धस यांनी केली आहे. मंगळवार दि. २५ रोजी विधीमंडळ कामकाजात विधानपरिषदमध्ये सकाळच्या सत्रात सुरूवातीपासूनच आमदार धसांनी जोरदार बॅटींग करत सभागृहाचे लक्ष वेधले आहे.आमदार धस यांचे सभागृहात बोलतांनाचे व्हिडीओ वेगवेगळ्या मुद्दयाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.त्यामुळे त्याची चर्चाही जोरदार होत आहे.


stay connected