खुंटेफळ साठवण तलावासाठी शिंपोरा ते खुंटेफळ या थेट जलवाहिनी कामाची निविदा १५ दिवसात काढणार
आ.सुरेश धस यांच्या अथक प्रयत्नांना यश
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी हा सतत दुष्काळी असलेला तालुका म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी शाश्वत स्त्रोत तयार करण्यासाठी खुंटेफळ साठवण तलाव हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत असलेल्या आष्टी उपसा सिंचन योजना क्र. ३
खुंटेफळ साठवण तलाव
या योजनेचा शिंपोरा ते खुंटेफळ थेट जलवाहिनी कामाचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यते मध्ये समावेश करण्यात आला असून लवकरच शिंपोरा ते खुंटेफळ या थेट जलवाहिनी कामाच्या निविदा येत्या १५ दिवसात काढण्यात येतील...
अशी माहिती आ. सुरेश धस यांनी दिली आहे
काल मुंबई येथे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या आयोजित बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होऊन ..उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शिम्पोरा ते खुंटेफळ या थेट जलवाहिनीच्या कामाचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये समावेश केल्याबद्दल आ.सुरेश धस यांनी त्यांचे आभार मानले आहेत
याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की,
आपण दिलेल्या दि.१५/०२/२०२३ रोजीच्या पत्रान्वये शिंपोरा ते खुंटेफळ थेट जलवाहिनी कामासाठी बी -1 निविदा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे केलेली मागणी मंजूर करण्यात आलेली आहे
सद्यस्थितीत तात्काळ १५ दिवसाच्या आत बी-1 निविदा प्रसिद्ध होणार आहेत त्यामुळे येत्या दोन वर्षाच्या आत खुंटेफळ साठवण तलावामध्ये पाणी येणार आहे
या योजनेसाठी शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या थेट जलवाहिनी कामासाठी आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये ४०० कोटी रु.निधीची पूरक मागणी करण्यात आली आहे..
या कामामुळे आष्टी तालुक्यातील २७,५४३ हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेला खुंटेफळ साठवण तलाव हा प्रकल्प असून पहिल्या टप्प्यामध्ये १.६७ अब्ज घन फूट मर्यादेत सुरुवातीला ८१४७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे या खुंटेफळ साठवण तलावामध्ये मराठवाड्याचे वाट्याचे असलेले५.६८ टी.एम.सी. पाणी पैकी प्रथम टप्प्यात १.६७ टी.एम.सी. पाणी मंजूर असून उर्वरित ४ टी.एम.सी. पाणी उपलब्ध करण्याबाबत देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आग्रही मागणी करण्यात आली आहे तसेच खुंटेफळ साठवण तलावाच्या पुढील क्षेत्रातील २ गावांचे पुनर्वसन हे तातडीने हाती घेण्यात येत आहे याबाबत जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे जलद गतीने भूसंपादन प्रक्रिया चालू असल्याचे ही आ.सुरेश धस यांनी पुढे सांगीतले अशा प्रकारचा निर्णय मुंबईतील बैठकीत झाल्याचे समजताच आष्टी तालुक्यातील शेतकर्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे
stay connected