Karjat Jamkhed नियोजीत MIDC ला अंतिम मंजुरीसाठी न्याय मार्गाने रस्ता रोको : दत्तात्रय वारे
- - - - - - - - - - - - - - - -
जामखेड - तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे व तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांनी 1999 साली जामखेड येथील 53 एकरात मिनी एमआयडीसीचे भुमीपुजन केले. या योजनेला 25 वर्षे झाली परंतु अद्याप ती बासनात गुंडाळून ठेवली आहे. आ. रोहीत पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाच्या मध्यभागी असलेल्या पाटेगाव खंडाळा येथील तेराशे एकरात एमआयडीसी व्हावी म्हणून मागील दोन वर्षांत प्रयत्न केले सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या नी ऐनवेळी सरकार बदलले. आ. रोहीत पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदर मुद्दा लावून धरला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लेखी आश्वासन देऊन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला म्हणून रस्ता रोको आंदोलन करून न्याय मागत आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी केले.
Vdo news
कर्जत जामखेड मतदारसंघातील तेराशे एकरात होणाऱ्या एमआयडीसी मंजुरी मिळावी यासाठी जामखेड येथील खर्डा चौकात रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशउपाध्यक्ष राजेंद्र कोठारी, बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, माजी सभापती सुर्यकांत मोरे, सुधीर राळेभात, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, युवक नेते प्रशांत राळेभात, मोहन पवार, महेश राळेभात, पिंटू बोरा, संदीप गायकवाड, चंद्रकांत आजबे, माजी सरपंच समीर पठाण, काकासाहेब वाळूंजकर, पवन राळेभात, नरेंद्र जाधव, वैजीनाथ पोले, उमर कुरेशी, शरद शिंदे, काकासाहेब कोल्हे, अमर चाऊस, शहाजी राळेभात, मंगेश आजबे, बापूराव शिंदे, प्रकाश काळे, प्रकाश सदाफुलें, कैलास वराट,हनुमंत पाटील, पवन राळेभात, युवराज ऊगले, सागर कोल्हे, विधा वाव्हळ,अनुराधा अडाले, वैशाली शिंदे, अनुष्का वारे, प्रिती सदाफुले, संगीता तोरडमल, स्मिता गुलाटी, तरनुम शेख , शुभांगी नन्नवरे, रंजना पवार आदी महिला उपस्थित होते
दत्तात्रय वारे पुढे म्हणाले, एमआयडीसीला झारीतील शुक्राचार्यानी विरोध केला. तरीही आ. रोहीत पवार यांनी उद्योगमंत्र्यांच्या वेळोवेळी भेटी घेतल्या. तसेच पावसाळी अधिवेशनात मंजुरीसाठी आ. रोहीत पवार यांनी विधानभवना समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर सोमवारी भरपावसात उपोषण केले. सरकारने दुसर्या दिवशी बैठक घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासन दिले दुसर्या दिवशी आ. पवार यांना उद्योगमंत्र्यांनी साडेचार तास ताटकळत ठेवूनही बैठक घेतली नाही. यावरून सरकार पुन्हा एकदा कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या निर्णयाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन केले आहे.
राष्ट्रवादीच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा पाठींबा
जामखेड येथे बीड रोडला २५० कोटी रुपयांची जागा अधिगृहीत असताना नवीन एम आय डी सी गरज पडली कारण ही जूनी एम आय डी सी अर्धी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या तर अर्धी मा. राम शिंदे यांच्या बगल बाच्यांच्या ताब्यात आहे म्हणून नवीन निर्माण करण्याची गरज भासली असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. मा .राम शिंदे हे निष्क्रिय आमदार आहेत असा आरोप करून पाटेगाव खंडाळा येथील प्रस्तावित एम आय डी सी बेरोजगर तरुणांसाठी जीवन दायीनी ठरणार आहे या जनहिताच्या प्रकल्पाला हे सरकार गलिच्छ राजकारण करून विरोध करत आहे म्हणून या सरकारचा संभाजी ब्रिगेड जाहीर निषेध करत आहे.
प्रतिनिधी नासिर पठाण सह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड



stay connected