Jal jivan mission अंतर्गत नळ योजना कामांचा Suresh Dhas यांनी घेतला आढावा

 Jal jivan mission अंतर्गत नळ योजना कामांचा Suresh Dhas यांनी घेतला आढावा



 बीड (प्रतिनिधी)

 जल जीवन मिशन अंतर्गत आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नळ योजनांची कामे सुरू असून या कामांच्या सद्यस्थितीत असलेल्या कामाबाबतचा आढावा आ.सुरेश धस यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांचे समवेत सर्व संबंधित अभियंता, अधिकारी आणि व्यापकॉस चे समन्वयक यांचे समवेत आढावा बैठक घेतली



 या बैठकीमध्ये आष्टी, पाटोदा आणि शिरूर का. तालुक्यातील सर्व योजनांचे कार्यान्वयन करण्यासाठी,  सुधारणा, बदल  तसेच काही अडचणी आहेत  काय ? 

याबाबतची सविस्तर चर्चा झाली आणि सर्व योजना लवकरात लवकर पूर्णत्वाकडे जाण्यासाठी सर्व तरी प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या..

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी  या योजनांच्या कार्यान्वयना बाबत कार्यकारी अभियंता आणि तीनही तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता आणि व्यापकॉस या कंपनीचे समन्वयक श्री एल डी घुले यांना आवश्यक त्या सूचना देऊन पाणीपुरवठा योजनांच्या दर्जेदार कामांबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले

 यावेळी या बैठकीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण, जि.प. चे माजी समाज कल्याण सभापती महेंद्र तात्या गर्जे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर माऊली जरांगे हे उपस्थित होते





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.