डोंगरगण येथे ICICI Foundation च्या सहकार्याने शेतकर्यांना केशर आंबा रोपांचे वाटप
शेतकऱ्यांना प्रत्येकी 15 केशर आंब्याच्या झाडांची रोपे देऊन एक शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचे काम आय.सी.आय.सी.आय.फाऊंडेशन मार्फत डोंगरगण येथे करण्यात आले. शेतकऱ्यांना बांधावर केशर आंबा लागवड करण्यात येणार आहे. गावात एकुण 79 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. गावात एकुण 1185 केशर आंबा रोपांची लागवड बांधावर केली जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल वाढविण्यासाठी नवीन प्रयत्न केला जात आहे.
डोंगरगण गावचे विद्यमान सरपंच श्री.ज्ञानेश्वर वाघ , उपसरपंच श्री.परमेश्वर कर्डिले, ग्रामपंचायत सदस्य, आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन तालुका समन्वयक श्री.यशवंत बहिरम यांच्या हस्ते केशर आंब्याची रोपं लाभार्थींना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



stay connected