Breaking news: गुंडेवाडी येथे शेतात पाळी घालताना विजेचा करंट लागल्याने शेतकऱ्याच्या मृत्यू

 Breaking news: गुंडेवाडी येथे शेतात पाळी घालताना विजेचा करंट लागल्याने शेतकऱ्याच्या मृत्यू

 


 विकास साळवे / बीडसांगवी आष्टी -

 ... आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गुंडेवाडी येथील शेतकरी बबन जयवंता जाधव ( 38 वय ) हे गुंडेवाडी येथे आपल्या शेतामध्ये मशागत करत असताना विद्युत पोल च्या ताणला करंट उतरला असल्यामुळे शेतात पाळी घालताना टच झाल्याने ही घटना घडली व त्यातच शेतकऱ्याचा दुर्दैव मृत्यू झाला आहे . महाराष्ट्र भर कृषी दिन साजरा होत असताना सध्याचे  पेरणी पूर्वी ची मशागत सुरू आहे त्यात पावसाने दडी मारली आहे . सकाळी दहा अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली . बीड सांगवी गुंडेवाडी कणसेवाडी परीसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे . त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलं मुलगी असा मोठा परिवार आहे . त्यांच्या अंत्यविधी वेळी नंदकिशोर करांडे सरपंच ,माजी सरपंच बबनराव करांडे , रामभाऊ गणगे , बापू गणगे , मुकादम सुभाष तात्या गणगे ,विठ्ठल कणसे ,महादेव गणगे ,तानाजी गणगे ,सदाशिव गणगे , उपसरपंच भाऊसाहेब गणगे ,तुकाराम धनवे ,सर्जाराव धनवे ,जानु गणगे आदि उपस्थित होते








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.