BJP News : आईच्या भूमिकेतून बीड जिल्ह्याला ग्रामविकास विभागाचा सर्वाधिक निधी दिला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे प्रतिपादन

 BJP News : आईच्या भूमिकेतून बीड जिल्ह्याला ग्रामविकास विभागाचा सर्वाधिक निधी दिला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे प्रतिपादन 




Pankajatai munde 

*******************************

आष्टीत भाजपा महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत टिफिन बैठक संपन्न..

****************************







आष्टी (प्रतिनिधी)

 भारतीय जनता पार्टी ही सर्वश्रेष्ठ संघटना असून जे करायचं ते देशासाठी आणि राष्ट्रासाठी समर्पित होऊन करायचं असं बाळकडू  बालपणीच मिळालं असल्यामुळे बीड जिल्ह्यासाठी मी सतत आईच्या भूमिकेतून काम केल्यामुळे  ग्रामीण विकास विभागाचा सर्वाधिक निधी बीड जिल्ह्यासाठी देऊ शकले असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले 

आष्टी येथील महा जनसंपर्क अभियान समारोप प्रसंगी आयोजित टिफिन बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या  यावेळी खा.डॉ.प्रीतम ताई मुंडे आ.सुरेश धस  व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी गरीब घराण्यात जन्म घेतल्या असल्यामुळे गोरगरीब जनतेच्या जाणिवा,उणिवा,अपेक्षा  मला त्यांच्याबरोबर सतत फिरल्याने माहीत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सर्वसामान्य कुटुंबातून आले असून त्यांची संघटनेसाठी सर्वोच्च त्यागी वृत्ती त्यामुळे संघटनेसाठी त्यांनी संसार त्यागला असून त्यांच्या घराण्यातील कोणीही राजकारणामध्ये नाही भारतीय जनता पार्टीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी त्यांनी त्याग आणि परिश्रमाचा संदेश देऊन देशाचे उज्वल भवितव्य घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून भारत देशातील गोरगरीब जनता, महिला, युवक,दिव्यांग, यांच्यासाठी त्यांनी गेली नऊ वर्षे अनेक उपक्रम राबवले असल्यामुळे ते जनतेत आणि भारतभरात  आणि जगभरात त्यांचे नेतृत्व उजळून निघाले आहे

 सध्या मी आमदार नाही, मंत्री नाही, खासदार नाही, मी सध्या केवळ तुमच्या आशीर्वादासाठी तुमच्या वरील प्रेमासाठी मी राजकारणामध्ये आहे 

मी ग्रामविकास मंत्री असताना बीड जिल्ह्याला मी भरभरून निधी देण्याचे कारण म्हणजे मी बीड जिल्ह्यातील जनतेची आई असून सर्वसामान्य जनता माझ्या लेकराप्रमाणे आहे इतक्या आत्मीयतेने मी जिल्ह्यासाठी काम केले आहे आई लेकरांची मागणी होण्यापूर्वीच त्याची मागणी पूर्तता करत असते त्याप्रमाणेच मी बीड जिल्ह्यासाठी काम केलेले आहे

 ग्राम विकास विभागामार्फत रस्ते केले,नळ योजना केल्या, शाळा खोल्या बांधकाम केले, सामाजिक सभागृह उभे केले, त्यातूनच गोरगरीब जनतेचे आशीर्वाद मला मिळत गेलेले आहेत हेच आशीर्वाद खूप मोठे आहेत भारतीय जनता पार्टीने सांगितल्याप्रमाणे 30 मे ते 30 जून या कालावधीमध्ये महा 

जनसंपर्क अभियान राबवताना मी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली,  मध्ये कार्यरत असून आपणास आणखी लोकसभा निवडणूक होईपर्यंत असेच कार्यरत राहावे लागणार आहे असे सांगून पंतप्रधान मोदींच्या जनकल्याणकारी योजना किती उपयुक्त आहेत याबाबतची माहिती आपण सर्वसामान्य जनतेच्या दारी जाऊन आपले काम वाजवून सांगितले पाहिजे तसेच

 महा जनसंपर्क अभियानाचा समारोप हा टिफिन बैठकी ऐवजी ही टिफिन महासभा झाल्याचे त्यांनी शेवटी सांगितले यावेळी खा.डॉ.प्रीतम मुंडे म्हणाल्या की या महा

जनसंपर्क अभियानाची सुरुवात मी आष्टी येथील मोर्चा ने केली होती आणि आज या जनसंपर्क अभियानाचा समारोप देखील आष्टीतच होत असून या दोन्ही कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले या यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते असे त्या म्हणाल्या यावेळी बोलताना आ.सुरेश धस यांनी सांगितले की पंकजाताई मुंडे या ग्रामीण विकास खात्याच्या मंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना रेकॉर्ड ब्रेक निधी या जिल्ह्याला दिला असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही अत्यंत प्रभावी रीतीने राबवल्यामुळे जिल्ह्यातील अगदी ग्रामीण भागात देखील अतिशय दर्जेदार रस्ते झाल्यामुळे विकास मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे पंकजाताई मुंडे यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे यापुढे सर्व कार्यक्रम होतील असेही त्यांनी सांगितले 

या टिफिन बैठकीसाठी समाजसेवक विजय गोल्हार, सलीम जहांगीर, देविदास नागरगोजे, जयदत्त धस, सागर धस, वाल्मीक निकाळजे, साहेबराव म्हस्के, भागवत येवले, सुरेश उगलमुगले, रमजान तांबोळी,जि. प.सदस्य अमर निंबाळकर,सभापती बद्रीनाथ जगताप,

किरण शिंदे, मधुकर गर्जे,संजय आजबे, डॉ.शैलजा गर्जे, सरपंच प्रतीभा थोरवे,महेंद्र गर्जे, अजिनाथ सानप, ज्ञानेश्वर माऊली जरांगे, शिवाजी पवार,संजय नवले, रंगनाथ धोंडे, आबूसेठ सय्यद,रामदास बडे, रोहिदास गाडेकर, रामराव खेडकर, जिया बेग, खंडूजाधव,गणेश शिंदे, भारत मुरकुटे, किशोर झरेकर, शम्मूभाई दारूवाले, शमशुद्दीन शेख, शरीफ शेख, सरपंच अशोक मुळे,आदिनाथ सानप,  कल्याण पोकळे,गणेश शिंदे,अनिल ढोबळे,यशवंत खंडागळे,शरद बामदळे, शांतीलाल भोसले,डॉ.पांडुरंग चौधरी,संजय नवले,आदाम शेख,प्रकाश खेडकर,नागरगोजे,अशोक गर्जे,असफाक अत्तार,सुनिल रेडेकर,खंडू जाधव,अतुल कोठुळे,कपिल अग्रवाल,संतोष रणशिंग,आत्माराम फुंदे,संदीप खकाळ,राजु जाधव,शरीफ शेख,राजेंद्र दहातोंडे, दत्तात्रय जेवे आदी उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर माऊली जरांगे यांनी केले







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.