Big update:अल्पवयीन मुलीचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या शिक्षकाला व लॉज मालकाला आरोपी करून कठोर शिक्षा करा

 आष्टीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले निवेदन


अल्पवयीन मुलीचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या शिक्षकाला व लॉज मालकाला आरोपी करून कठोर शिक्षा करा





आष्टी प्रतिनिधी - येथील शहराच्या हर्षद लॉजवर १४ जून रोजी जामखेड येथील शिक्षक राधाकिसन ऊर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर याने शाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय निष्पाप मुलीला ब्लॅकमेल करून अनेकवेळा अत्याचार केले. या प्रकरणात जामखेड पोलीसांनी आरोपीला अटक केलेली असुन न्यायालयाने त्रास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त केला जात असून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करून संबंधित लॉज चालक व मालक यांना याप्रकरणी सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी आष्टी येथील सर्व समाज बांधवांनी आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांना शुक्रवारी (ता.३०) निवेदनाद्वारे करण्यात आली.



शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात कर्यरत असणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन शिक्षकी पेशाला काळीमा फासलेला आहे. आष्टी शहर हे अविकसीत शहर आहे कोणताही नवीन धंदा, उद्योग धंदा येथे दहशतीमुळे येत नाही. आष्टी शहराची लोकसंख्या गेल्या पाच वर्षापासुन आहे तेव्हढीच आहे. जामखेड-नगर रोडवर लॉजेसची संख्या गेल्या पाच वर्षात वाढलेली आहे. आष्टी शहरात कोणतेही मोठे धार्मिकस्थळ नाही, पर्यटन स्थळ नाही, एम.आय.डी.सी. नाही परंतु लॉजेसची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लाॅज हे दारुच्या दुकानाचे अडे असून याठिकाणी वेश्याव्यवसाय सर्रास चालतो. महिलांना पिडीत करण्यांसाठी वापर होतो ही बाब चिंताजनक असल्याने आष्टी शहराचे नांव बदनाम होत आहे. या लॉजेसला कायदेशीर परवानगी आहेत का ? सी.सी.टी.व्ही. फुटेज नोंदणी रजिस्टर, आधारकार्ड, ओळखपत्र, आकारण्यात येणारे भाडे लॉजवर येण्याची वेळ जाण्याची वेळ इत्यादी तपासण्यात यावेत. आष्टी शहरात राजकीय दहशतीमुळे चांगले कार्यक्षम अधिकार आष्टी येथे नोकरी करण्यास येत नाही. आलेले अधिकारी बदली करुन घेण्याचा प्रयत्न करतात कायदा सुव्यवस्था रहिलेली नाही यामुळे वातावरण दुषीत झालेले आहे. यास कोण जबाबदार आहे हे पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनास माहीत आहे. राजश्रय असल्यामुळे आष्टी शहरातील अपवादात्मक परिस्थितीत एखादी लॉज चांगली आहे का सर्रास अनैकतेचा बाजार चालु आहे.

आष्टी शहरात माफियांचे राज्य असुन राज्य मार्गावर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी रात्री ८ वाजेनंतर बस स्थानकावर सुळसुळाट असतो महीलांसाठी व प्रवाशासाठी असुरक्षित वातावरण असते ही वस्तुस्थिती आहे.

जामखेड येथील शिक्षकाने अमिष दाखवुन हेतुपुरस्कर ब्लॅकमेल करून अल्पवयीन विद्यार्थीनीवर केलेला अत्याचार प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणातील आरोपी राधे ऊर्फ राधाकिसन जगन्नाथ मुरुमकर यांना सेवेतून बडतर्फ करुन जलदगती न्यायालयात खटला चालवुन आरोपीस फाशीची शिक्षा देण्यांत यावी. आष्टी (जि.बीड) येथील हर्षद हॉटेल लॉजींगचे मालक यांना सहआरोपी करुन लॉजींगचे लायसन्स कायमस्वरुपी रदद करावे.  संबंधित शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षकांची व महिला पोलीसामार्फत विद्यार्थ्यांनीची चौकशी करुन मुख्याध्यापकावर जबाबदारी निश्चीत करुन कारवाई करावी. खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या इयत्ता ८ वी ते १० वी च्या सर्व शिक्षकांची फोटोसह मोबाईल नंबरसह माहीती संकलीत करण्यात यावी,

सदरील घटना अत्यंत गंभीर असुन पालकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. शिक्षण हे आयुष्य उज्वल भविष्य घडविण्यासाठी घेतात परंतु अशा शिक्षणामुळे आयुष्य उध्वस्त हेत असेल तर त्याचा काय उपयोग ? भविष्यात असे प्रकार होवु नये याबाबत संस्था चालक व गटशिक्षणाधिकारी यांना सक्त सुचना देवुन दक्षता घेण्याबबात व अशा बाबी निदर्शनास आल्यानंतर तात्काळ पोलीसांनी कारवाई करावी यासह आदी मागण्याचे निवेदन शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.