कु .तनिष्का सुभाष ऊढाणे या विद्यार्थिनीचे राज्य स्तरीय स्पर्धेमध्ये सुयश
शहरातील मुलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील मुले कमी राहू नयेत.यासाठी मुलांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून एवरेस्ट अबॅकस अकॅडमी मार्फत ३० जुलै २०२३ रोजी २२ व्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन नगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,सेवानिवृत्त शिक्षण संचालक माननीय दिनकर टेमकर साहेब,या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यात अबॅकस ची पहिली स्टेप पूर्ण करत ५ मिनिटात ११६ गणिते सोडवून नगर शहरातील आनंद विद्यालयातील इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या कु.तनिष्का सुभाष ऊढाणे या विद्यार्थिनीने यश संपादन केलय.या साठी तिला तिच्या अबॅकस शिक्षिका पूनम अतुल सोनावणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून सध्याच्या सोशल मीडिया च्या युगात मोबाइल पासून दूर राहून केवळ अभ्यासात वेळ घालवत मला MPSC/UPSC अभ्यासक्रम पूर्ण करून मोठा अधिकारी होण्याची इच्छा आणि त्यासाठी च आतापासून तयारी करत असल्याचे मत कु.तनिष्का सुभाष ऊढाणे हिने व्यक्त केलय. तालुक्यातून तसेच ग्रामीण भागातील शाळेमधून १५०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.स्पर्धेत सर्व सहभागी विद्याथांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले तर आभार अकॅडमीच्या संचालिका सौ . घडेकर मॅडम यांनी मानले.



stay connected