वृक्षतोड रोखा तक्रार आल्यास त्वरीत गुन्हे दाखल करा - सुरेश पाटोळे

 वृक्षतोड रोखा तक्रार आल्यास त्वरीत गुन्हे दाखल करा - सुरेश पाटोळे



     पर्यावरणाचा समतोलसाठी केंद्र व राज्य सरकार कोट्यवधींचा निधी लागवड व संगोपनासाठी खर्च करत असताना, जिल्हयात अनेक गावांत झाडांवर विनापरवाना कुऱ्हाड चालवली जाते. त्यामुळे झाडे तोडल्याचे निदर्शनात आल्यास किंवा एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यास त्वरीत पंचनामे करून वृक्षतोडनाऱ्या व्यक्तीवर व संबंधित जागा मालकावर गुन्हे दाखल करावीत. असा आदेश शिव संघर्ष ग्रुप चे पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी विभागीय वन अधिकारी कैलास गिते यांना दिला आहे.

     माणसाच्या गरजा वाढत आहेत असे म्हणण्यापेक्षा लोकसंख्या वाढीमुळे एक स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा स्पर्धेत फक्त स्वार्थ साधला जातो. निसर्गाचा आणि पर्यावरणाचा कोणीही विचार करताना दिसून येत नाही. जेवढ्या औद्योगिक संस्था, शिक्षण संस्था, घरे, इमारती या मागील तीन दशकांत निर्माण झाल्या तेवढ्या यापूर्वी कधीही झाल्या नव्हत्या. त्या सर्वांसाठी लाकडाचा वापर हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतच आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड करण्यात येत असल्याने पृथ्वीवर जगण्यासाठी लागणारी हवा आणि पाणी हे झाडांवर अवलंबून आहे. जलचक्र पूर्ण होण्यासाठी जमिनीवर पाऊस पडावा लागतो. पाऊस पडण्यासाठी थंड आणि पर्यावरणयुक्त असा भूभाग आवश्यक असतो. त्यासाठी सदाहरित वृक्षांची गरज भासते. जेवढी वृक्षसंख्या जास्त तेवढा पाऊस जास्त पडतो. आता जर आपणच झाडे तोडली तर पाऊसाचे प्रमाण कमीच होईल. झाडे देखील श्वसन क्रिया करत असतात ज्यामध्ये ऑक्सिजन बाहेर सोडून कार्बन डायऑक्साइड आत घेतात. माणसासाठी आणि इतर सजीवांना ऑक्सिजन आवश्यक असतो. तसेच सर्व सजीव कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात. म्हणजेच झाडे आणि सजीव हे एकमेकांना प्राण प्रदान करतात असे म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. तसेच गाड्यांमधून आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारे विषारी वायू हे देखील झाडेच शोषून घेतात.

     वृक्षतोड जर झाली तर आपण आपलेच नुकसान करवून घेत आहोत. परिसरात झाडे नसल्याने उष्णता वाढत आहे. मानवी त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी ही उष्णता काही हितावह नाही. तसेच वायू प्रदूषणही झाल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. वृक्षतोड थांबवून परिसरात जर झाडांची संख्या वाढवली तर माणसाचे आरोग्य सुधारेल आणि दुष्काळ कधी येणार नाही. झाडे आपली मुळे जमिनीत खोलवर नेतात. त्यांना पाण्याची गरज भासते. पाऊस पडल्यावर जमिनीत मुरणारे पाणी झाडांची मुळे आपोआप शोषून घेतात. त्यामुळे झाडांची वाढ होते. जमिनीचा कस नियंत्रित राखला जातो. मातीची धूप होत नाही. पण जर वृक्षतोड झाली तर मातीची धूप होऊन जमिनीचा कस संपुष्टात येईल. पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही. प्राणी आणि पक्षी जीवन संपुष्टात येईल. माणसाकडे विकासाच्या नावाखाली अनेक यंत्रे आहेत ज्याद्वारे कित्येक वर्षे जगलेला वृक्ष एका दिवसात नेस्तनाभुत केला जातो. जंगलच्या जंगल रिते केले जाते. तेथील प्राणी आणि पक्षी स्थलांतर करतात. त्यांची पाण्याची आणि खाण्याची समस्या आणखी एकदा डोके वर काढते. सर्वच्या सर्व वन्यजीवन विस्कळीत होते. एखादी नदी असेल, तिच्या शेजारील वृक्ष जर तोडले तर ती नदी उन्हाळ्यात सुकून जाते. निसर्गचक्रात एक मोठा अडथळा वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला आहे. पृथ्वीवर अचानक तापमान खूपच वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे आणि प्रदूषणामुळे ओझोनचा थर लोप पावत आहे. अशा एक ना अनेक समस्या फक्त वृक्षतोडीशी निगडित आहेत. वृक्षतोड थांबवा. एक आनंदी पर्यावरण स्वतःसाठी आणि समाजासाठी निर्माण करा. अश्या सूचनाही सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वृक्षतोड विरोधात मोहीम राबवा. असंख्य झाडे लावा, त्यांना जगवा. तेव्हाच एक मानवजातीचे उज्ज्वल भविष्य पुढच्या पिढ्यांसाठी आपण निर्माण करू शकतो. असेही सुरेश पाटोळे यांनी सांगितले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.