अंगणवाडी सेविका उतरल्या रस्त्यावर मणिपूर सरकारचा केला निषेध

अंगणवाडी सेविका उतरल्या रस्त्यावर मणिपूर सरकारचा केला निषेध




आष्टी ता.२५ ( संदीप जाधव )-

मणिपूरमध्ये जमावाकडून महिलांना नग्न करून धिंड काढण्याची आली. सदरील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून सदरील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी (ता.२५) महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आष्टी तालुक्यातील अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरून मणिपूर सरकारचा निषेध नोंदवत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मणिपूरच्या घटनेने देशात संतापाची लाट उसळली आहे.महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली. या घटनेतील दोषींना मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात यावी तसेच तेथील निष्क्रिय सरकार बरखास्त करावे यासाठी मंगळवारी (ता.२५) महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने अंगणवाडी सेविका महिलांनी एकत्र येत एकात्मिक बालविकास कार्यालयापासून हातात निषेधाचे फलक घेऊन आष्टी शहरात निषेध व्यक्त करत रॅली काढण्यात आली. यावेळी मणिपूर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवत श्रीमती वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा गनीभाई तांबोळी, नसीम सय्यद, आशा शेंडगे, शोभा साठे, उषा राऊत, रत्नमाला लाहोर, आशा वखरे, अलका सानप,रामकवर भोगाडे, संगीता गरुड,सुशीला बांगर, मथुरा कुत्तरवाडे, रेश्मा चौधरी, वैशाली सुंबरे, सविता थोरवे,बिबी बेग, कुसुम थोरवे यांच्यासह तालुक्यातील ३०० हून अधिक अंगणवाडी सेविका मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.