खुंटेफळ ते वाटेफळ रस्ता स्वखर्चाने केला दुरूस्त
खुंटेफळ ते वाटेफळ या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली होती दररोज लोक संताप व्यक्त करत होते. हे पाहून खुंटेफळ गावचे मयुर मोढवे पाटील यांनी स्वखर्चातून मुरूम टाकून खड्डे बुजविले.रस्त्यातील मोठे खड्डे आणि त्यात पाणी साठल्याने जागोजागी तयार झालेली तळी रहिवाशांची मोठी डोकेदुखी ठरत होती. रात्री ये-जा करताना या असंख्य खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे वारंवार अपघातही होत होती . याबाबत महामार्ग प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर मयुर मोढवे पाटील यांनी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त केला. खड्ड्यात साचलेले पाणी जेसीबीच्या सहाय्याने काढून रस्ता कोरडा केला त्यात मुरूम टाकला. आता महामार्ग प्रशासनाने रस्त्याचे काम करून ही समस्या कायमची सोडवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.


stay connected