मनसेचे मैनुद्दीन शेख यांचा वाढदिवस समाजबांधव,मित्र मंडळी,सहकारी पदाधिकारी आणि वॉर्डवाशीयांकडून जल्लोषात साजरा.

 मनसेचे मैनुद्दीन शेख यांचा वाढदिवस समाजबांधव,मित्र मंडळी,सहकारी पदाधिकारी आणि वॉर्डवाशीयांकडून जल्लोषात साजरा.



 उल्हासनगर दि :- जनसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उचलून त्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे,प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्या समस्या मार्गी लावणारे,गोर-गरिबांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे,समाज बांधव असतील,मित्र मंडळी आणि सहकारी पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिकांमध्ये अतिशय लोकप्रिय असे उल्हासनगर मनसेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष  मैनुद्दीन  शेख यांचा  वाढदिवस त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी,मित्र मंडळींनी, समाज बांधवांनी आणि प्रभागातील नागरिकांनी अतिशय जल्लोषात साजरा केला.

   याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणारे  राज ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार आणि प्रभागातील जनसामान्यांना विशेषतः महिला वर्गाला भेडसावणाऱ्या पाण्याच्या,कचऱ्याच्या,

स्वच्छते विषयीच्या तसेच शासकीय कार्यालयातील कामांच्या संबंधातील समस्या आणि अश्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्नशील असलेले मैनुद्दीन शेख यांचा प्रभागातील महिला वर्गाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरे टोप आणि तलवार भेट देऊन सत्कार केला.

    यावेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर साहेब,माथाडी सेनेचे सरचिटणीस  राजन शितोळे ,चाळसे ,कामगार सेनेचे दिलीप थोरात,शालीग्राम सोनवणे, वाहतूक सेनेचे काळू थोरात, विद्यार्थी सेनेचे कल्पेश माने तसेच पक्षातील सर्व सहकारी,मित्र मंडळी, समाजबांधव आणि प्रभागातील नागरिक,महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.