महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण मिळावे, म्हणून कायदा असल्याचे ऐकले आहे

 महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण मिळावे, म्हणून कायदा असल्याचे ऐकले आहे.


मात्र उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि पिडीत महिला कर्मचाऱ्यांना याबाबत गांभीर्य नसल्याचे झाले उघड.......


 उल्हासनगर  :-  (रमेश कांबळे) -उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता विभागात लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने आयुक्त अजीज शेख यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अश्लील चाळ्याबाबत लेखी तक्रार दिल्याने एकच खळबळ उडाली.लैंगिक शोषणाच्या या गंभीर प्रकरणात आयुक्तांनी महापालिकेची अबू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून त्या संबधीत  अधिकाऱ्यांची कानउघडणी करून कारवाईचे संकेत दिले.अशी माहिती त्यांनी एका दैनिक वर्तमान पत्राला देत तसेच यापूर्वीही एक अशीच तक्रार आली असल्याचे त्यांनी सांगितले.यावरून आयुक्तांना महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण मिळावे, म्हणून कायदा असून यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही महापालिकेचीच आहे याबाबतची माहिती नाही हे आश्चर्य वाटण्या सारखंच आहे.

आयुक्त अजीज शेख यांनी याप्रकरणी त्यांना पिडीत महिला कर्मचाऱ्याची तक्रार प्राप्त होताच सर्वात अगोदर पालिकेत अस्तित्वात असलेल्या विशाखा समिती समोर हे प्रकरण आणून पिडीत महिलेच्या ओळखीबाबत गोपनीयता पाळली  पाहिजे होती.परंतु आयुक्तांनी याप्रकरणी वर्तमानपत्राला त्या संबधीत अधिकाऱ्यांची कानउघडणी करून कारवाईचे संकेत देत यापूर्वीही एक अशीच तक्रार आली असल्याची माहिती दिली.तसेच पिडीत महिला कर्मचाऱ्याने एका स्थानिक न्युज चँनेलवर याप्रकरणाची माहिती देताना महापालिकेच्या विशाखा समितीकडे याबाबत तक्रार करून न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली.यावरून याप्रकरणात हेच दिसून येते की, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि पिडीत महिला कर्मचाऱ्यांना महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण मिळावे यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्याचे गांभीर्य  नाही.किंवा हे प्रकरण दबावतंत्राचा एक भाग तर नाही ना अशी शंका उपस्थित होते.

कोणाच्याही मनाविरुद्ध केलेला कोणताही शारीरिक जवळिकीचा प्रयत्न लैंगिक शोषण या सदरात मोडतो. सहकारी, कर्मचारी, कोणीही व्यक्ती जर कोणत्याही प्रकारे अशी मनाविरुद्ध शारीरिक जवळीक साधायचा प्रयत्न करत असेल तर ते शोषण प्रकारात मोडते. अश्लील विनोद करणे, दिसण्यावरून, पोषाखावरून भाष्य करणे,अश्लीलतेने कोंडून ठेवणे , काम करताना द्वयर्थी (वरवर सहज, पण ज्यातून अश्लील अर्थ सूचित होऊ शकतो अशी) भाषा वापरणे, मनावर विचित्र ताण येईल असे वागणे. असे सर्वच प्रकार लैंगिक शोषणामध्ये मोडतात. याशिवाय उगाचच स्पर्श करणे, रोखून पाहत राहणे, अप्रत्यक्षपणे शरीरसुखाची मागणी करणे, चिकटून उभे राहणे, स्वच्छतागृहात अश्लील मजकूर लिहिणे, मुद्दाम एकटक रोखून पाहत राहणे, इत्यादी प्रकारे शोषण होऊ शकते. लैंगिक शोषण हे एका प्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे असे मानले जाते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.