Vasantrao Naik यांच्या जयंती निमीत्त दौलावडगाव येथे प्रगतशिल शेतकऱ्यांचा गौरव
0Tejwarta News Networkजुलै ०२, २०२३
Vasantrao Naik यांच्या जयंती निमीत्त दौलावडगाव येथे प्रगतशिल शेतकऱ्यांचा गौरव
आष्टी / संदीप जाधव / अनिल मोरे -
स्व .वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्त आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे प्रगतशिल शेतकऱ्यांचा गौरव सोहळ्याचे आयोजन दि १ जुलै शनिवार रोजी करण्यात आले होते . या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी कुलगुरू किसनराव लवांडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब भोसले , जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर , तालुका कृषी अधीकारी गोरक तरटे , डाळींबाचे व्यापारी तानाजी चौधरी , अनंत हंबर्डे ,हभप आंधळे महाराज , हभप बबन महाराज बहिरवाल , पं स. सदस्य परमेश्वर काका शेळके , प्रा . राम बोडखे , नवनाथ तांदळे , विठ्ठल गुंड सर , किरण पिसोरे , मुथ्या सेठ , सरपंच भरत जाधव , महादेव डोके , दिनकर तांदळे , नंदू फसले , माजी कृषी अधिकारी जगताप साहेब , गोटीराम कोहोक , शौकत भाई तांबोळी सह आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी कृषी भूषण बाबासाहेब पिसोरे यांनी लिहीलेल्या कांद्याची सुवर्णशेती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्ती चे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
हरितक्रांतीचे जनक माननीय मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त प्रगतशील व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने करण्यात आले होते . हा कार्यक्रम सोनाई मंगल कार्यालय दौलावडगाव येथे संपन्न झाला . यावेळी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना व शेती विषयावर सखोल मार्गदर्शन व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक भारतीय कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी भूषण पुरस्कार विजेते बाबासाहेब पिसोरे यांनी प्रस्ताविक केले . यावेळी प्रयोग शिल शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला . यामध्ये विजया गंगाधर घुले ,कैलास मारुती आंधळे ,विश्वंभर कुंडलिक जगताप ,दत्तात्रय भागुजी विधाते , हनुमंत लक्ष्मण गावडे ,अशोक दादासाहेब खेडकर ,जालिंदर उत्तम देवकर , संदीप रमेश गीते ,श्रीकांत अण्णासाहेब पवार ,महादेव बाबुराव भोसले ,सोनाली भागवत गर्जे ,श्रीराम बाबासाहेब सानप , संध्या विष्णू माळी ,प्रणव साईनाथ राऊत , मनोज शिवराम घुमरे ,दत्तात्रय लक्ष्मण ढेरे , तुकाराम नारायण ढवळे , सुभाष साहेबराव साबळे ,धनपाल भगवानराव गोंडे ,मुक्ताराम शिवाजी सोनवणे ,रामेश्वर अर्जुन बडगुजे ,सुदर्शन शिवाजी घोडके ,विश्वंभर भगवान घोडके ,अंबादास अभिमान डोईफोडे ,आनंद दत्तोपंत उबाळे ,शिवाजी पांडुरंग खोरदे ,आबासाहेब सिताराम राऊत , राजेंद्र निवृत्ती आतकरे ,जयंत सुखदेव शिनगारे ,कल्याण प्रभाकर कुलकर्णी , अतुल शाल्विंद सोळंके , राजाभाऊ गणपत नाईकनवरे , अण्णासाहेब भास्कर गायकवाड , अमोल रामा राऊत या प्रयोगशिल शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला . तसेच फळपीक व सेंद्रिय भाजीपाला या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन झाले .
प्रस्ताविक - कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे आण्णा
स्व .वसंतरावांनी हरित क्रांती घडवून शेतकर्यांचे जिवनमान उंचावले .भारतीय कृषक समाजाचे संस्थापक पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य अनमोल आहे . शेतकऱ्यांना पेंशन कृषक समाजाच्या सातत्याने पाठपुरावा केलेल्या प्रयत्नातुन मिळतेय. जे नवीन शेतकरी सेंद्रीय शेती व प्रयोगशिल शेती करतात अशा शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन त्यांना प्रेरणा देणे गरजेचे . बीड जिल्हयातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित केले. शेती मध्ये प्रबोधनाची खुप गरज आहे . भारताचे कांद्यातील उत्पादन कमी आहे. त्याचे मुख्य कारण बियाणे हेच आहे ! म्हणुन बियाणे शुद्ध व चांगले वापरा . ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कांद्याला १०० रु च्या पुढे भाव मिळणार आहे कारण कांदा चाळी मधील कांदा टिकणार नाही . व शॉर्टेज जाणवणार आहे त्यामुळे आताच कांदा विकू नका . असा सल्लाही यावेळी कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांनी शेतकऱ्यांना दिला .
अनंत हंबर्डे -
पिसोरे साहेबांना पद्मभूषण पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली . झांडांबरोबर बोलणारा शास्त्रज्ञ म्हणजे बाबासाहेब पिसोरे हे होय . ते सातत्याने शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात . शेती करावी तर पिसोरे साहेबांची प्रेरणा घेऊनच करा . शेती संस्कृती ची जाणिव पिसोरे आण्णांकडे पाहिल्यावर होते . ते शेती मित्र आहे .
बीडीओ सानप साहेब -
रेशीम उत्पन्न ३० कोटी वार्षीक उत्पन्न . शेतकऱ्यांनी योजना समजुन घेऊन राबवाव्यात . MREGS अंतर्गत 262 कामे करता येतील . आष्टी तालुका दुष्काळी आहे परंतु शेतकरी प्रगतशिल आहेत .
तानाजी चौधरी -
सर्वांना सोबत घेऊन शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ठ कार्यक्रम राबवणार . कांदा पिकाला न्याय देणार . डाळींब उत्पादकांनाही चांगला भाव देऊन नेहमीच त्यांना मदत करण्यास आम्ही तत्पर राहु . शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्वांनीच आपआपल्या परिने प्रयन्न केले पाहीजेत .सेंद्रीय फळ उत्पादन केल्यास देशात वेगळी बाजारपेठ उभी करू . डाळींबाला 500 रु चा भाव मिळणार . दोन वर्षे डाळींबाला मंदी आली नाही . शेतकऱ्याचा माल देशाच्या कानाकोप्यात नेण्याचे के डी चौधरी कंपनीने काम केले .
हभप आंधळे महाराज -
शेतकरी सर्व बाजूनी दुर्लक्षितच . शेतकऱ्यांचे नाव घेऊन पुढारी मोठे होतात . आत्महत्या करू नका आष्टी तालुक्यात दिड महिन्यात 43 आत्महत्या झाल्या . बळीराजा हा राजाच आहे . एक दिवस बळीराजाचे राज्य नक्की येईलच .
प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब भोसले -
शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त शेती करावी . बारकावे शोधावे . शेतकऱ्याना पेंशन चालु करण्यासाठी कृषक समाजाचे मोठे योगदान . पिसोरे साहेबांनी नेहमी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शेती प्रेमी शेतकरी तयार करण्याचे कार्य केले .
माजी कुलगुरू किसनराव लवांडे -
शेतकऱ्यांचे कष्ट , संशोधकांचे परिश्रम व तत्कालीन धोरणांमुळे शेतीत क्रांती झाली आहे . एकत्रीत शेती व गटशेती गरजेची . सरकारी ग्यानबा ची मेख म्हणजे मालाला हमीभाव नाही . शेतकऱ्यांना नफा फक्त १० ते १५ टक्के मिळतो . शेतकरी जेव्हा आपल्या मालाचा भाव स्वतः ठरवेल तेव्हा खऱ्या अर्थाने सुखी होईल . ओतुर ( जुन्नर ) येथे कांदा व केळी चे उत्पादन घेतात . कंपनीला अपेक्षीत माल व शेतकरी ठरवतील तो भाव असे असल्यामुळे शेतकरी समृद्ध होतो. १०० शेतकरी एकत्रीत असतील तर व्यापारी तुमच्याकडे माल घेण्यासाठी येतील . तालुका स्तरावर कांदा उत्पादक संघ व्हावा . 40% शेतकरी शेती व्यवसाय सोडण्याच्या मार्गावर आहेत .म्हणुन सरकारला जागे व्हावे लागेल त्यासाठी शेतकर्याने संघटीत व्हावे सेंद्रीय शेती करताना अभ्यास करावा . शेंद्रीय शेतीने उत्पादन खर्च कमी होतो . ग्राहक निर्माण करायला लागेल म्हणून तंत्र समजुन घेऊन शेती करावी . शेती शिवाय पर्याय नाही . उत्पादनाचे मुल्यवर्धन करणे गरजेचे. शेतकऱ्यांनी ग्रुप शेती कडे वळावे .
stay connected