उपअधिक्षक Bhumi Abhilekh कार्यालयाकडून Ahamadnagar Muharram निमीत्त दोन्ही सवारींना फुलांची चादर अर्पण

 उपअधिक्षक Bhumi Abhilekh कार्यालयाकडून Ahamadnagar Muharram  निमीत्त दोन्ही सवारींना फुलांची चादर अर्पण




उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून अहमदनगर मोहर्रम निमीत्त दोन्ही सवारींना फुलांची चादर अर्पण


अहमदनगर - अहमदनगर शहर येथील मोहरम उत्सव हा ऐतिहासिक असून त्याला पाचशे वर्षाची अखंड परंपरा आहे. या पाचशे वर्षाच्या मोहरम उत्सवाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर, भारतातील सर्व समाज बांधव उत्साहाने सामील होतात आणि या सणांमध्ये हिंदू मुस्लिम भावा भावाप्रमाणे सण साजरा करतात त्यामुळे ह्या सणाला जातीय सलोखा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतो. असे प्रतिपादन आरिफ भाई शेख जिल्हा अध्यक्ष कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ अहमदनगर यांनी केले आहे.उपाधीक्षक भूमी अभिलेख अहमदनगर कार्यालयाकडून या वर्षीही दोन्ही सवारींना चादर अर्पण करण्यात आली .

        दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उपधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय व भूमी अभिलेख कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्याकडून जिल्हा अध्यक्ष श्री .आरिफ भाई जैनुद्दीन शेख यांच्या शुभहस्ते दोन्ही सावाऱ्यावर  फुलाची चादर अर्पण करण्यात आली यावेळी जेष्ठ कामगार नेते एन .एम. पवळे ,केंद्रीय अध्यक्ष कास्ट्राइब महासंघ जिल्हा अध्यक्ष के के जाधव आणि पदाधिकारी उपस्थित होते .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.