Ayushman Bharat : पारोडी येथे आ भा कार्डचे वाटप

 Ayushman Bharat : पारोडी येथे आ भा कार्डचे वाटप



आष्टी तालुक्यातील पारोडी येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले . शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष भाई शिवाजी सुरवसे पाटील यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमातून हे कार्ड वाटप रविवार दि . १६ रोजी वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच बंकट परकाळे हे होते तर प्रमुख पाहूणे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माते दादासाहेब जगताप व तेजवार्ता न्युज चे संपादक सय्यद बबलूभाई हे होते . यावेळी बोलताना शिवाजीराव सुरवसे यांनी सांगीतले की ग्रामिण जनते पर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचणे गरजेचे असून कार्यकर्त्यांनी गोरगरीब शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे . यावेळी बोलताना चित्रपट निर्माते दादासाहेब जगताप म्हणाले की शिवाजीराव सुरवसे नेहमी ग्रामिण जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करत असतात . त्यांचे कार्य प्रेरणादायी असुन इतर राजकारणातील कार्यकर्त्यांनीही त्यांच्या सारखे समाजकार्य नियमीत करत रहावे व जनकल्याणकारी योजनांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे . यावेळी उपस्थित ग्रामस्थांचे आ भा कार्ड वाटप करण्यात आले 



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.