आषाढी एकादशी निमित्त जि प प्राथ शाळा गंगानगरच्या शाळेची वृक्षदिंडी
आषाढी एकादशी निमित्त जि प प्राथ शाळा गंगानगरच्या शाळेने वृक्षदिंडी काढली . विठ्ठल व रुक्मिणी, डोक्यावर तुळस, टाळांचा गजर, भगवे पताका घेऊन पर्यावरणचा संदेश देण्यासाठी आज चिमुकल्यांनी वृक्षदिंडी काढली. ज्ञानेश्वर माऊलींच्या परिसरात पैस खांबाचे दर्शन घेऊन वृक्षारोपण संदेश समाजाला दिला .या वृक्षदिंडीमध्ये नव्याने रुजु झालेले नेवासा तालुक्याचे गटविकास अधिकारी मा श्री प्रदिप शेंडगे साहेब, सहायक गटविकास अधिकारी मा सुरेश पाटेकर साहेब, तसेच माजी गटविकास अधिकारी संजय दिघे साहेब, गटशिक्षणाधिकारी मा शिवाजीराव कराड साहेब यांनी वृक्षदिंडीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. असे उपक्रम होणे गरजेचे आहे हा संदेश यावेळी दिला, या दिंडीत सर्व शिक्षक, पालक देखील सहभागी झाले. भक्तीमय वातावरणात दिंडी उत्साहात पार पडली
stay connected