जातीय दंगलीची चौकशी करून कारवाई करावी - पोलिस अधिक्षकांना शिवसेनेचे निवेदन !

जातीय दंगलीची चौकशी करून कारवाई करावी - पोलिस अधिक्षकांना शिवसेनेचे निवेदन !



 गेल्या काही दिवसापासुन अहमदनगर जिल्हयामध्ये जातीय तनाव बनला असुन त्यामुळे नगर जिल्हयात ठिकठिकाणी जातीय दंगली घडत आहे. याबाबत शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख शेख मुजीब यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक याना निवेदन दिले आहे .नगर शहरात दंगल झाली त्याच प्रमाणे दि. १४ मे २०२३ रोजी संध्याकाळी संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी शेवगाव येथे दंगल झाली. त्याच प्रमाणे संगमनेर, श्रीरामपुर तसेच नगरमध्ये जेऊर या ठिकाणी देखील दंगली झाल्या.

नगर जिल्हयात गेल्या काही दिवसापासुन जातीय तनाव बनला असुन ठिकठिकाणी दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे व त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या मनात भिती निर्माण झाली आहे. सर्व सामान्य जनता दहशतीखाली वावरत आहे. व्यापारी, महिला भगीनी असुरक्षित समजत आहेत.

त्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसापुर्वी नगर शहरात भाजपाचे आमदार निलेश राणे नगर शहरात आले होते व नगर येथे त्यांनी सभा घेतली होती त्या ठिकाणी त्यांनी प्रक्षोभक भाषण केले होते . दोन समाजात तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर भाषण त्यांनी त्या ठिकाणी केले होते व त्याच वेळेपासुन नगर जिल्हयात सर्वत्र दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यापारी व दुकानदार तनावाखाली वावरताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे दि. १४ मे २०२३ रोजी शेवगाव येथील दंगल ही सुध्दा खरं म्हणजे दोन समाजात चिथावणीखोर भाषणामुळे झाली आहे. 


शेवगाव येथील दंगलीमध्ये व्यापाऱ्यांची दुकाने फोडले. गाडया फोडून जाळण्यात आल्या . मोठया प्रमाणावर महिला भगीणीना मारहाण झाली. या दंगलीचा सखोल चौकशी व्हावी व जे खरे गुन्हेगार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी त्याच प्रमाणे तेथील व्यापारी वर्गाला संरक्षण मिळावे. आमदार निलेश राणेनी महाराष्ट्रात जिथे जिथे भाषण केले त्या त्या ठिकाणी दंगली झाल्यात आपण त्या ठिकाणच्या त्यांच्या भाषणाची क्लीप सुध्दा तपासावी म्हणजे आपणास सर्व उलगडा होईल.

त्यामुळे आपणास विनंती आहे की, आ. निलेश राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी. तसेच त्यांना नगर जिल्हा बंदी करावी अन्यथा नगर जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात दंगली घडू शकतात व त्याची संपूर्ण जवाबदारी त्यांची राहील. आ. निलेश राणे यांना अटक न झाल्यास येणाऱ्या काळात शिवसेनाच्या वतीने जिल्हाभर अंदोलन करण्यात येतील असे निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक अहमदनगर यांना शिवसेनेतर्फे सादर करण्यात आले आहे.


यापूर्वी शिवसेना नगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनीही दि. १६/०५/२०२३ रोजी निवेदन देवुन देखील त्यावर कोणत्याही प्रकारे ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे दंगलीचे प्रमाण जिल्हयामध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. असे पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात उत्तर नगर जिल्हा प्रमुख शेख मुजीब , राजेंद्र दळवी (नगर-दक्षिण जिल्हा प्रमुख ) , प्रमोद लबडे (नगर-उत्तर जिल्हा प्रमुख ) ,संजय गव्हाणे (वाहतूकसेना जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख ) ,अशोक थोरे ,रावजी नांगरे ,रावसाहेब गुंजाळ (मा. उपजिल्हा प्रमुख) ,अरुण पाटील (मा. जिल्हा संघटक ) आदींनी म्हटले आहे .







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.