टाकळी आमिया येथील एका गौरी उर्फ गोदावरी सुभाष गायकवाड हिने मानसिक त्रासाला कंटाळून केली आत्महत्या.
अनिल मोरे/कडा.
आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया येथील गौरी उर्फ गोदावरी सुभाष गायकवाड हिने रविवार दिं4मे 2023रोजी मानसिक छळाला कंटाळून केली आत्महत्या गौरी उर्फ गोदावरी सुभाष गायकवाड हिचे लग्न 2011साली सुभाष आनंदा गायकवाड रा. टाकळी आमिया ता. आष्टी जि बीड यांच्याशी हिंदु रितीरिवाजाप्रमाणे विवाह करण्यात आला.गौरी उर्फ गोदावरी सुभाष गायकवाड 3ते4वर्ष व्यवस्थीत नांदवले त्यानंतर त्यांच्यामध्ये छोटे मोटे घरगुती स्वरूपात वाद होत होते .
त्यावेळी सुभाष आनंदा गायकवाड यांचे कडा याठिकाणी सलुनचे दुकान त्यानंतर त्यांच्या लग्नाचे 3ते4वर्षानंतर सुभाष आनंदा गायकवाड यास दारु पिण्याचे वेसन लागल्याने सलुनचे दुकान बंद करण्याची वेळ आली .
सुभाष हा गौरी उर्फ गोदावरी हीला रोज दारू पिऊन मारहान करत असे.
व गोरी उर्फ गोदावरी ती आपल्या मुलांचा विचार करुन सर्व काही सहन करत होती गौरी उर्फ गोदावरी चे लग्न झाल्या पासुन तिचे दिर विठ्ठल आंनदा गायकवाड व जावूबाई स्वाती विठ्ठल गायकवाड नेहमी वाईट बोलुन तिला घरातील व शेतातील करण्यास लावत होते.
तिचा दिर व जावूबाई तिला त्रास देऊन तिचा मानसिक छळ करत होते.
त्यांच्या त्रासाला कंटाळून गौरी उर्फ गोदावरी बर्याच वेळा आई वडीलांकडे जात होती.
आई वडील तिला समजावून सांगत व पुन्हा सासरी पाठवत देत होते.
मागील दिड महिन्यापुर्वी गौरी उर्फ गोदावरी हीने आपल्या वडीलांना फोन करुन सांगितले की माझा पती दिर व जावूबाई या तीन व्यक्तीपासुन खुप त्रास होत आहे.
तरी गौरी उर्फ गोदावरी हीने यांच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या या तिघांन वर अखेर
कडा पोलीस चौकी येथे गुन्हा नोंदवण्यात आला कलम पुढील प्रमाणे 306,498A,34वरील प्रमाणे गुंन्हा दाखल करण्यात आला व पती सुभाष आनंदा गायकवाड यांना ताब्यात घेतले असुन विठ्ठल गायकवाड व जावूबाई स्वाती विठ्ठल गायकवाड हे फरार असुन. पोलिसांनी पती सुभाष आनंदा गायकवाड यांना न्यायालयीन हाजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पीएसआय चाटे साहेब हे करीत आहे.


stay connected