अहमदनगरच्या नामांतराला उच्च न्यायालयात आव्हान
नगर - अहमदनगरचे अहिल्यादेवी नगर असे नामांतर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोंडी येथे केली होती. या नामांतराला नगर येथील मोईन अब्दुल लतीफ देशमुख यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. देशमुख यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नामांतराची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी ३१ मे रोजी चोंडी येथे केली होती. जिल्ह्यात नामांतराची मागणी कोणीही केली नसताना, अहमदनगरवासियांना न विचारता आमच्या शहराचे, जिल्ह्याचे नाव बाहेरच्यांनी का ठरवले? असे मुद्दे याचिकेत मांडण्यात आले आहेत. देशमुख यांच्यातर्फे मानवाधिकार विधीज्ञ अॅड. रेहाना देशमुख काम पाहत आहेत. याचिकेची पुढील सुनावणी २१ जूनला होणार आहे.

stay connected