सायकल - आरोग्य व पर्यावरणरूपी वरदान..!
धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून सांगणारे नसून, या वाढत्या वातावरणात स्वतःला फिट ठेवणे या बदलत्या लाईफ स्टाईल मध्ये सर्वांना आव्हानात्मक आहे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसून आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यायाम करत असतोच त्यामधील एक उत्तम प्रकार म्हणजेच सायकलिंग असून सायकल ही वरदानपेक्षा कमी नाही ती आरोग्यरूपी व पर्यावरणीय दृष्टिकोनातून लाभदायक असून सर्वांनी शक्य तिथे सायकल चा पर्याय वापरून आपण ठणठणीत राहुन आपले पर्यावरण स्वच्छ ठेवणे येणाऱ्या पिढीसाठी लाभदायक ठरणारे आहे.
कोण किती व्यायाम करतो, ह्यापेक्षा किती नियमित पणे करतो हे महत्त्वाचे आहे .आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणूस शारीरिक हालचाली कमी होऊन आजाराला सामोरे जाताना आपण बघत आहोत, नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात व शरीर निरोगी राहते. रोगप्रतिकारक क्षमता वाढते, मानसिक आरोग्य व्यायामामुळे उत्तम राहते. व्यायामाचे अनेक प्रकार आपण करत असतो.चालणे ,धावणे, पोहणे, दोरीवरील उड्या ,जिममध्ये जाणे, योगासने करणे आदी व्यायाम प्रकार याच्या माध्यमातून आपण आपले आरोग्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातील एक प्रकार म्हणजे सायकल चालवणे होय.
सर्वात सोपा व आवडता खेळ प्रकार म्हणजे सायकल. बालवयातील सर्वांच्या लाडकी सायकल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आरोग्यदायी व सोपा व्यायामाचा प्रकार म्हणजे सायकल होय. ज्यामध्ये कमीत कमी शारीरिक त्रास होतो वजन नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते.एक ना अनेक फायदेच सायकल चालवल्याने होतात.आपण नियमित किवा आपण आठवड्यातून किमान तीन दिवस तरी सायकल चालवली पाहिजे. सुदृढ शरीर व सुंदर निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर अनुभूती आपणास सायकल चालवताना अनुभवायला मिळेल.सायकल चालवणं म्हणजे पर्यावरणाचे संवर्धन तसेच इंधनाची बचत हि होते व आपले आरोग्यही यामधुन जपले जाते हे महत्त्वाचे.
सायकलिंग हा एक एरोबिक व्यायाम प्रकार असुन मानवी शरीरात त्याचे अनेक फायदे आहेत. नियमित सायकल जर आपण चालवली तर फुफ्फुस, हृदय, मासपेशी, हाडे, सांधे आदी उत्तम राहतात.आपले रक्त संचारण चांगले होते, वजन नियंत्रित राहून अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते ,आपल्या स्नायूंची हालचाल होऊन स्नायू मजबूत होतात ,शारीरिक फिटनेस चांगला राहतो.
सायकल चालवणे आपल्या आरोग्याला फार उपयुक्त ठरते, केवळ इंधन बचतच नाही तर विविध शारीरिक व्याधी,आजार पासून आपले संरक्षण सायकल करते .आजच्या धावपळीच्या जगात पर्यावरण संवर्धन बरोबरच प्रदूषण मुक्ती व आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी सायकल चालवणे हा चांगला मार्ग असून सर्वांनी सायकल चालवली पाहिजे हे महत्वाचे वाटते.
नेहमी सायकलीचा वापराने आपले हार्ड हेल्दी राहते. शारीरिक रक्त प्रवाह चांगला राहतो, शक्य त्या कामासाठी आपण सायकलचा वापर केला पाहिजे. यांने इंधना बरोबरच शारीरिक व्यायामही आपला भरपूर होतो.आपल्यापैकी काही जण असे करतातही आता आपणही ते केले पाहिजे ,आपल्यापैकी अनेक जण विविध मार्गांनी आरोग्यदायी जीवनासाठी व्यायामाचे विविध प्रकार करत असतात त्यात सायकल नियमित चालवणे फायद्याचे ठरते.
नियमित सायकलिंग केल्याने वजन नियंत्रित राहते ,अतिरिक्त चरबी कमी होते ,हृदयाशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी सायकल चालवणे खूप फायदेशीर ठरते. सायकलचे अतिशय सकारात्मक परिणाम मानवी शरीरावर होतात. साखरेचे स्तर संतुलित राहण्यास मदत होवुन शरीर निरोगी राहण्यास मदत होते. शरीरातील रक्त संचारण चांगले राहते, साखर नियंत्रित राहते, सायकलमुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. मधुमेह, लठ्ठपणा,पक्षघात आदी यासारखे आजार कमी करण्यास सायकल मदतीशिर ठरते.
सायकलचा वापर वाढल्यास इंधनाची बचत होवून व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ध्वनी, हवा प्रदूषणापासून मुक्ती मिळेल. पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल. म्हणून शक्य त्या ठिकाणी सायकलचा वापर वाढवणे सुजाण नागरिकांनी आपले कर्तव्य समजले पाहिजे.
सायकल नियमितपणे चालवणे आपल्यासाठी खूप आरोग्याच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने, प्रदूषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून सर्वांनी नियमित सायकल चालवली पाहिजे व आपले आरोग्य नियमित व्यायाम करून निरोगी सुखी जीवन जगले पाहिजे.स्वतः च्या आरोग्य बरोबरच निसर्गाचं आरोग्यदेखील चांगल आणि प्रदूषणमुक्त ठेवायचं असेल,तर नेहमी सायकल चालवली पाहिजे, निसर्ग आहे म्हणून आपण आहोत हे न विसरता हे केलं पाहिजे.शेवटी आरोग्य हीच खरी संपत्ती असून सायकल ही मानवी जीवनास आरोग्यदायी वरदान आहे....!
- श्री.राहुल मोरे
मो.न.९४०४१८११८१

stay connected