Emotional : खाडे सरांची बदली निरोप समारंभ सारा गाव ढसा ढसा रडला
आष्टी तालुक्यातील वाकी येथील सावतानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक असलेले भैरवनाथ खाडे सर यांची प्रशासकीय बदली झाली सर्व ग्रामस्थांच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आपल्या आदर्श, उपक्रमशील, शिक्षकाला निरोप देण्याकरता जमलेल्या गावाला गहिवरून आले आणि अक्षरक्ष: सारा गाव ढसा ढसा रडला जिल्हा परिषद शिक्षक यांची बदली झाल्यानंतर सहसा निरोपात समारंभाचा कार्यक्रम गावाकडून होत नाही परंतु भैरवनाथ खाडे सर यांनी मागील नऊ वर्ष या शाळेसाठी अनेक विद्यार्थी घडवण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध, उपक्रमशील आनंददायी, उत्साही वातावरणामध्ये अनेक उपक्रम शाळेसाठी गॅदरिंग, आठवडी बाजारांचे आयोजन, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर शिक्षण, महापुरुष जयंत्या, खेळाच्या स्पर्धा, आणि विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन अनेक प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे आवड निर्माण होऊन आपल्या शिक्षका विषयी मनात वेगळे आदराचे स्थान निर्माण झाले, खाडे सरांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने वाकी गावातील शेतकरी व पालक यांच्याशी अतूट नातेसंबंध निर्माण केले व आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिराळ शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक संतोष दाणी सर, व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चेअरमन सुरेश आस्वर हे होते
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संतोष दाणी सर बोलताना म्हणाले की शिक्षकाने आपले काम प्रामाणिकपणे जबाबदारीने केले पाहिजे बेईमानी करणाऱ्याला नियती माफ करत नाही, आपण कामात येणारी अडचणी एकमेकांच्या विचारातून सोडवल्या पाहिजे, जिल्हा परिषद सरकारी शाळांचा दर्जा हा चांगला असून अनेक वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळेतून घडतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, यावेळी अनेक मान्यवर, विद्यार्थी, पालकांनी सरांविषयीचे आठवणी व मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच सोमनाथ आस्वर, युवानेते संदीप कारंजकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश आस्वर, सावता आस्वर, दीपक खरपुडे, लक्ष्मण आस्वर, प्रकाश आस्वर, केतन आस्वर, बंटी आस्वर, प्रवीण खरपुडे यांनी परिश्रम घेतले यावेळी गणपत आस्वर, कुंडलिक आस्वर, बाबासाहेब ससाणे, गौतम ससाणे, संतोष आस्वर, अशोक कोरडे, सुनीता जगताप मॅडम, गहिनीनाथ वाघुले सर, रमेश कोरडे, माऊली आस्वर, दिलीप आस्वर, सुभाष खरपुडे, विठ्ठल लकडे, जालिंदर आस्वर, बाळासाहेब साबळे, सुनिल आस्वर, निलेश आस्वर, दत्तू खोटे, अशोक आस्वर, सुनंदा आस्वर, संगीता ससाणे, महिला, पुरुष, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावतानागर शाळेचे शिक्षक मुटकुळे सर यांनी केले व आभार शिक्षिका गहिले मॅडम यांनी मांडले...
stay connected