Bakri eid : नंदुरबार जिल्ह्य़ातील मुस्लिम समुदायाच्या धाडसी निर्णयाने वेधले संपूर्ण राज्याचे लक्ष

 Bakri eid : नंदुरबार जिल्ह्य़ातील मुस्लिम समुदायाच्या धाडसी निर्णयाने वेधले संपूर्ण राज्याचे लक्ष ! 

   



       राज्यात काही भागात दोन गटात अनेक कारणांमुळे वादाच्या घटना होत असतानाच नंदुरबार जिल्ह्य़ातील मुस्लिम समुदायाने मात्र एक धाडसी निर्णय घेतला आहे.जगभरात येत्या 29 जूनला बकरी ईद साजरी होत आहे. याच दिवशी महाराष्ट्राचे अध्यात्मिक दैवत विठुरायाची आषाढी एकादशीही आल्याने या दिवशी बकरी ईदची कुर्बानी न देता एकादशीनंतर सण साजरा करण्याचा निर्णय नंदुरबार जिल्ह्य़ातील मुस्लीम समुदायाच्या बहुतांश लोकांनी घेतला असून राज्यात सौहार्द व सद्भावनेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

        नंदुरबारचे जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना नागरिकांनी एकोप्याचे दर्शन घडवावे असे आवाहन केले होते त्यास जिल्ह्यातील  मुस्लिम समुदायाने सकारात्मकता दाखवून आषाढी एकादशी दिवशी हिंदू बांधवांच्या भावना जपण्यासाठी ऐक्याच्या दिशेने स्वतःहून एक पाऊल पुढे टाकले आहे.एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय ऐच्छिक असला तरी जवळपास सर्व मुस्लिम समुदायाने व मौलानांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे.या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून नंदुरबार पोलीसांचे या निमित्ताने कौतुक होत आहे. 

      सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणा-या नंदुरबार पोलीस टीमचे प्रमुख पोलीस अधीक्षक पी.आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचेसह नंदुरबार पोलीस उपअधीक्षक श्री.संजय महाजन, अक्कलकुव्याचे श्री.सदाशिव वाघमारे, शहाद्याचे श्री. दत्ता पवार,गृह पोलीस उपअधीक्षक श्री विश्वास वळवी तसेच पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,किरण खेडकर,भारत जाधव,शिवाजी बुधवंत,राहुल पवार,निलेश गायकवाड, ज्ञानेश्वर वारे, दीपक बुधवंत,निशामुद्दीन पठाण, API दिनेश भदाणे,राजन मोरे,धनराज निळे,प्रकाश वानखेडे यांच्या टीमने याकामी चांगली भूमिका बजावली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.