Marathi News : वस्तीवाढीसाठी मंजूर झालेल्या भुखंडाचे वाटप करण्याची मागणी.

Marathi News : वस्तीवाढीसाठी मंजूर झालेल्या भुखंडाचे वाटप करण्याची मागणी.



रंजीत घाडगे/केज :- केज तालुक्यातील केवड येथे वस्ती वाढीसाठी मंजूर झालेल्या भू खंडाचे वाटप करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.


या बाबतची माहिती अशी की, केवड ता. केज येथील मागासवर्गीय कुटुंबांना वास्तव्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी सन १९८७३-७४ मध्ये सर्व्हे नं. ९५ मधील ८० आर म्हणजे २ एकर भूखंड मंजूर झाला होता. परंतु त्या भूखंडा शेजारी स्मशानभूमी असल्यामुळे त्यावेळी तत्कालीन लाभार्थ्यांनी अंधश्रद्धेपोटी व भीतीपोटी ते भूखंड ताब्यात घेतले नाहीत. तेथे राहण्यास त्यांनी नकार कळविला होता. मात्र आता येथील नागरिकांना वस्तीवाढीची आवश्यकता भासत आहे. पूर्वी राहात असलेल्या ठिकाणी त्यांना अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून दि. २६ जून रोजी पन्नास नागरिकांच्या सह्या असेल निवेदन नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांना दिले आहे. निवेदनात त्यावेळी वस्तीवढीसाठी मंजुर झालेला भूखंड हा त्या कुटुंब आणि त्यांच्या वारसांना देण्याची मागणी केली आहे.

निवेदनावर आश्रुबा तुपारे, अंबादास तुपारे, शाहू तुपारे, छ्बु तुपारे, भिमराव तुपारे, उत्तरेश्वर तुपारे, संभु तुपारे, विनोद तुपारे, आश्रुबा तुपारे, शाहु तुपारे, बाबासाहेब तुपारे, संदिपान तुपारे, भारत तुपारे, संदीपान तुपारे, अंबादास तुपारे, सुधाकर तुपारे, महादेव तुपारे, बाबासाहेब तुपारे, मिलिंद तुपारे, अंकुश तुपारे, रवींद्र तुपारे, जालिंदर तुपारे, अश्रूबा तुपारे, अभिजित तुपारे, चंद्रमणी तुपारे, गौतम तुपारे, रामराजे तुपारे, संजीवन तुपारे, केतन तुपारे, सुदाम गवळी, हरेंद्र तुपारे, परमेश्वर तुपारे, विकास तुपारे, लक्ष्मण तुपारे, सत्यभान तुपारे, धिरज तुपारे, दिपक तुपारे, प्रकाश तुपारे, महेंद्र तुपारे, गणेश तुपारे, राजकुमार तुपारे, राजकुमार तुपारे, महादेव तुपारे, राजामती तुपारे, रुपेश तुपारे, मधुकर तुपारे, तुषार तुपारे, समाधान तुपारे, संतोष तुपारे, अच्युत तुपारे, संभु तुपारे, गुलाब तुपारे, दिनकर तुपारे, भास्कर तुपारे, वसंत तुपारे, प्रदिप तुपारे, विकास तुपारे अशा ५४ लोकांच्या सह्या आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.