भविष्याच्या हितासाठी पर्यावरणपूरक जीवन मानवासाठी लाभदायक..!

 भविष्याच्या हितासाठी पर्यावरणपूरक जीवन मानवासाठी लाभदायक..!




विकासही हवाय परंतु तो, निसर्गाची हानी करून नव्हे तर निसर्ग आणि पर्यावरणाला जपून व भरभरून. विकास हा पृथ्वी ,वायू, जंगल, अग्नी, आकाश या पंचतत्वावर पर्यावरणीय विकासाचा विचार करणे व त्यासाठी अधिकाधिक कार्य करणे गरजेचे असून पर्यावरण आणि वातावरणीय बदलाविषयी गांभीर्याने वेळीच घेणे महत्त्वाचे आहे. आपली जैवविविधता जपणे ,वाढवणे त्याचे संवर्धन करणे आपल्या पृथ्वी कालावरील प्रत्येक माणसाची जबाबदार नसून कर्तव्य आहे. निसर्ग टिकला तर आपण टिकू म्हणून सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नची गरज आज आहे,हे जर आपण केले नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही हे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गांभीर्यपूर्वक सांगावेसे वाटते. पर्यावरणाचा संबंध मानवाच्या व या पृथ्वीतलावरील सर्व सजीव घटकाच्या निरंतर जगण्याची असून पृथ्वी निवासीयांनी याचे वेळीच गांभीरे ओळखून जागतिक स्तरावर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आज काळाची गरज बनत चालली आहे.आज जर प्रदूषणाचा विचार केला तर जल-जंगल-जमीन मधील झालेले प्रदूषण वेळी थांबवणे व वस्तूची निर्मिती करताना त्याचा पर्यावरणीय हित पाहून करणे गरजेचे आहे.
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे', यावर विनम्र श्रद्धाभाव असणारी व 'हे विश्वची माझे घर', आणि 'वृक्ष माझा मित्र सखा', याप्रमाणे सर्व सजीव सृष्टीला आपलं कुटुंब समजुन जीव लावणारी आपली संस्कृती आहे, या संत महंतांच्या अभंग प्रमाणे फार पूर्वी ही निसर्गाला किती महत्त्व होते, मानव निसर्गाविषयी,झाडांविषयी, वनाविषयी, आपल्या निसर्ग सौंदर्या विषयी किती जागरूक होता हे आपणास दिसून समजून येते, अनेक संतांच्या अभंगातून त्याच्या लेखनातून निसर्गाविषयी 'प्रेम-आवड-महत्त्व' पटवून दिले आहे. आपणही ते समजून घेणे गरजेचे आहे.दरवर्षी ५ जून हा दिवस ' जागतिक पर्यावरण दिन ' म्हणून साजरा केला जातो.  पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे,  पर्यावरणाच्या समस्या व  पर्यावरण  संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून सुयोग्य अशा पोषक  वातावरणाची निर्मिती करणे, हा  पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर जसजशी सजीवांची उत्क्रांती होत गेली,तस तशी विविध प्राण्यांचे अस्तित्व निर्माण होत गेले,या उत्क्रांतीत मानव हा बुद्धिमान प्राण्याची प्रगती सर्वाधिक प्रमाणात झाली, मानवी जीवन जगत असताना मानवी संस्कृतीच्या जवळपास ९५ टक्के काळ मानव निसर्गाचा एक भाग म्हणून अस्तित्वात होता,परंतु कालांतराने इतर प्राण्यापेक्षा मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर,कल्पनाशक्तीच्या जोरावर, स्मरणशक्तीमुळे,आकलन शक्तीमुळे वाच्याशक्तीमुळे निसर्गावर सतत अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला व आजही करीत आहेत.अश्मयुगापासून ते आजचे तंत्रज्ञान युगापर्यंत मानवाने निसर्गावर म्हणजेच पर्यावरणावर आपले स्वार्थी वृत्तीमुळे आघात करण्याचेच कार्य केले आहे.एकेकाळी निसर्गावर अवलंबून असणारा माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर,त्याचा चॅलेंज करताना दिसत आहे आणि निसर्गाच्या चक्राला अडथळे आणत आहे व त्याच्या परीणामालाही सामोरे जाताना तो दिसत आहे.
५  जुन हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून पर्यावरण विषयक  जागतिक जनजागृतीला प्रोत्साहन  देण्याच्यादृष्टीने फार महत्त्वाचा आहे.हा दिन मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो, निसर्ग,चक्र आणि पर्यावरण याचे प्रमाण सर्वसाधारण मानवाचे पृथ्वीवरील अस्तित्व जर व्यवस्थित टिकवायचे असेल, तर जंगलाचे प्रमाण सर्वसाधारणपणे ३३% असणे आवश्यक आहे, ते वाढवणे गरजेचे आहे निसर्गाचा समतोल आणि जैवविविधतेची स्थिरता टिकवण्याची गरज आहे, त्यात विविध पर्याय पैकी एक म्हणजे झाडाची मोठ्या प्रमाणात लागवड करणे हा होय, निसर्गाचे व सजीवांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी झाडाचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून त्या प्रती आस्था ठेवली पाहिजे. आपली नैसर्गिक संपदा आपण जपली, वाढवली पाहिजे.
आज मानव अगदी प्रगतीपथावर आहे, सर्व जीवनावश्यक वस्तूची मानवाने निर्मिती करून आपले जीवन सुखकर केले आहे.आधुनिकीकरण, नागरिकीकरण,जागतिकीकरण या संकल्पना रूढ होऊन प्रगती होत आहे, लोकसंख्येचा प्रचंड वाढत्या प्रमाणामुळे लोक आपल्या स्वार्थासाठी बेसुमार जंगलतोड करून मानवनिर्मित सिमेंटची जंगलं उभारत आहेत,आपल्या हातूनच आपला घात करत आहेत. निसर्ग चक्रावरच आपले जीवनमान अवलंबून आहे त्याच्या सहवासात आपण निरोगी जीवन जगू शकतो, आपल्या जवळ असलेल्या निसर्गाचा ठेवा डोंगर,नद्या,धबधबे,वृक्ष, झाडे-झुडपे, पशु -पक्षांचा किलबिलाट आदींची सोबत दुर्मिळ होताना दिसत आहे, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व डोंगरांचे सपाटीकरण त्यामुळे उध्वस्त होत चाललेले जंगले-वने याचा परिणाम पर्यावरणा चा समतोल बिघडत चाललेला आहे त्याची झळही सर्वांना बसत आहे. हे चित्र बदलण्यासाठी मानवाने वेळीच 'शहाणं' होऊन झाडे लागवड मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे.
कधी अतिवृष्टी,कधी दुष्काळजन्य परिस्थिती,कुठं नदीला आलेला भयावह पूर तर कधी तापून टाकणारे कडकडीत ऊन,तर कधी गोठवून टाकणारी थंडी तर अचानक आलेली चक्रीवादळ काही ना काही विचित्रच ? घडताना दिसत आहे याचे कारण निसर्गाचे चक्र विस्कळीत होत आहे, हे सर्वांनी समोर प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह ? उभे करत आहे.ग्लोबल वार्मिंग, क्लायमेट चेंज वातावरणात झालेले बदल यासारखे एक ना अनेक कारणे त्यामागे आहेत म्हणून हे बिघडलेलं निसर्गाचं चक्र पूर्वपदावर आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या योजना यातील प्रमुख उपाय म्हणजे 'ग्रीन कव्हर'! पृथ्वीवरील हरित कवच वाढवणे संपूर्ण पृथ्वी हिरवळीने नटवणे ही पृथ्वी पूर्वीप्रमाणे हिरवीगार करणे हे आपणा सर्वांना मिळून कराव लागणार आहे आणि मानवी जीवन सुखकर करणं आणि हे करावंच लागेल ? जमिनीवरील जंगलाचा प्रमाण वाढवणे हे महत्त्वाचे आहे यात प्रत्येकाचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
आपण सर्वांनी एक लोकचळवळ उभी करून लोकांना झाडाचे,आपल्या निसर्गाचे,आपल्या निसर्गसौंदर्याचे महत्त्व पटवून झाडे लावून लागवड करून त्याचे संरक्षण संगोपन केले पाहिजे.सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करून 'आपल्या घरात जितकी माणसे, तितकीच झाडे लावून' ती जगली पाहिजेत,वाढवली पाहिजेत.आपल्या सृष्टीला पुन्हा हिरवेगार पांघरून घालण्यास सहकार्य केले पाहिजे व आपली 'जैविक विविधता' टिकवण्यास मदत केली पाहिजे,ही आज काळाची गरज आहे.
पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वाना आपल्या नैसर्गिक ठेव्याची जाणीव असणे महत्वाचे असुन त्याविषयी कार्य करणे, लोकचळवळ उभी करणे व प्रत्येकाचा सहभाग असणे,आपल्या नैसर्गिक सेवेची जाणीव व कार्य करणे समाजात जागृतीची आवश्‍यकता असून यात प्रत्येकालाच सहभाग महत्त्वाचा आहे.
हो आझोचा थरा विषय गांभीर्याने घेणे महत्त्वाची बाब असून तो ढालीसारखे आपले कार्य करते.सूर्याचे अतिनील किरणे थेट जमिनीवर येण्यापासून रोखण्याचे काम ओझोन चा थर करतो याचा थर अलीकडच्या काळात रेफ्रिजरेटर,प्रदूषण करणारी वाहने, ए.सी.,कारखान्यातून निघणारा दूषित वायू,आदीचा वाढत चाललेला वापरामुळे ओझोनच्या थरवर वाईट परिणाम होत आहे ही बाब गंभीर असून चिंता वाढवणारी आहे.कार्बन चक्र हे पृथ्वीवरील औष्णिक संतुलन राखण्यास तसेच वातावरणातील प्राणवायू चे संतुलन राखण्यासाठी अतिशय महत्त्वाचे कार्य करते,परंतु मागील दीड वर्षापासून म्हणजेच मुख्यतः औद्योगिक क्रांतीनंतर कार्बन चक्राचे संतुलन बिघडण्यास सुरुवात झाली.बेसुमार जीवा जीवनावश्यक इंधनाचा वापर, बेसुमार जंगलतोड याचा परिणाम पृथ्वीचे वाढत चाललेले तापमान याचा परिणाम गंभीर होणार असे शास्त्रज्ञांनी भाकीत केले आहे. म्हणून भविष्याच्या हितासाठी पर्यावरण पूरक जीवन मानवी आरोग्यासाठी लाभदायक ठरणारे आहे.


- श्री.राहुल मोरे
मो.न.९४०४१८११८१

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.