नवनियुक्त शिवसेना बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या उपस्थितीत केज मध्ये रविवारी जिल्हा बैठक.....

 नवनियुक्त शिवसेना बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या उपस्थितीत केज मध्ये रविवारी जिल्हा बैठक.....



केज (प्रतिनिधी)

शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने 

शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब व शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा ( पुर्व) विभाग करिता *रत्नाकर शिंदे* यांची दिनांक 22 मे 2023 रोजी जिल्हा प्रमुख या पदासाठी निवड करण्यात आली  ....

         निवडी नंतर प्रथमच बीड जिल्हा केज - अंबाजोगाई -परळी- माजलगाव -वडवणी- धारुर- तालुका शिवसेनेची बैठक दिनांक 28 मे 2023 रोजी  सकाळी 11:00  वाजता  शिवसेना नेते खा . चंद्रकांत खैरे साहेब सचिव खा.विनायक राऊत साहेब खा.अनिलजी देसाई साहेब उपनेत्या सुषमाताई अंधारे समन्वयक मा.विश्वनाथ नेरूरकर साहेब मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार सुनील दादा धांडे सर सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या  उपस्थितीत नवनियुक्त शिवसेना बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तिरुपती मंगल कार्यालय केज येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी केज अंबाजोगाई परळी माजलगाव वडवणी धारुर येथील शिवसेना महिला आघाडी युवा सेना जिल्हा पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख  उपतालुकाप्रमुख. उपशहरप्रमुख विभाग प्रमुख सर्कल प्रमुख  वाहतूक सेना किसान सेना सह अंगीकृत संघटना आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन रत्नाकर शिंदे यांनी केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.