अभिनेता माजिद खान व असलम रंगरेज संगमनेर यांचा साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मान
संगमनेर (प्रतिनिधी ) .
ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने.साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार देऊन अभिनेते माजीद खान व असलमभाई रंगरेज यांना सन्मानित करण्यात आले . साई बाबांच्या पावन भूमीत शिर्डी येथे हाॅटेल के.बी.एस.ग्रॅन्ड येथे भव्य दिव्य असा सत्कार सोहळा संपन्न झाला . यावेळी अभिनेता माजिदभाई खान व असलम रंगरेज यांना अनेक दिग्गज मान्यवर कलाकार तसेच राजकिय व्यक्तींच्या हस्ते ट्रॉफी,कोल्हापुरी फेटा,सन्मानपत्र व गुलाब पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी पुरस्कार सोहळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.सुदाम संसारे.सर , उपाध्यक्षा वंदना गव्हाणे मॅडम,कार्याध्यक्ष मा.राज भालेराव सर , यांनी अभिनेता.व संगमनेर तालुक्यातील भुषण श्री. माजिदभाई खान याच्या नावाची निवड केली माजिदभाई हे कलाकार तर आहेच पण सामाजिक क्षेत्रातही ते उल्लेखनीय कार्य करत आहेत . तसेच असलम रंगरेज यांनी अनेक चित्रपट, शॉर्ट फिल्म,अल्बम साँग, मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे साधा अभिनय उत्तम डायलॉग डिलिव्हरी याने सर्वांना भुरळ घातली आहे . त्याच्याही कार्याची दखल घेऊन अतिशय मानाचा व सन्मानाचा समजला जाणारा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे .माजिदभाई खान व असलम रंगरेज यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे . त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.
stay connected