चिंचोली येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
आष्टी तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी अंकुश बाबुराव एकशिंगे (वय ४४ ) यांनी कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली .
सविस्तर वृत्त असे की अंकुश बाबुराव एकशिंगे या शेतकर्याने कांदा उत्पादनासाठी कर्ज घेतले होते मात्र कांद्याला भाव न मिळाल्यामुळे व कर्ज वाढत गेल्यामुळे अंकुश एकशिंगे यांनी दि . २१ रविवारी सायंकाळी ९ वा . शेतात जाऊन विषारी औषध प्राशण केले . ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल केले . मात्र उपचारा दरम्यान त्यांचे सोमवारी रात्री निधन झाले त्यांच्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजता चिंचोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे .
stay connected