माळेवाडी- वनवेवाडी येथील अवैध दारू बंद करा महिला ग्रामस्थाची पोलिस निरीक्षक अंमळनेर यांना निवेदन पाठऊन मागणी
आष्टी प्रतिनिधी
माळेवाडी- वनवेवाडी येथील अवैध दारू बंद करा महिला ग्रामस्थाची पोलिस निरीक्षक अंमळनेर यांना पोस्टा द्वारे निवेदन पाठऊन मागणी केली आहे या निवेदनात म्हटले आहे की वनवेवाडी -माळेवाडी, ता- आष्टी. जि-बीड येथिल एक व्यक्ती आडदांड व गुंड प्रवृत्तीचा असून तो गावात अवैध दारू विक्री करत आहे. त्यामुळे गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन कुटुंब उद्धवस्त होत आहेत. त्यामुळे गावातील महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत , त्यामुळे गावातील सामाजिक वातावरण खराब होत आहे. तो व्यक्ती महिला ग्रामस्थांना मनत आहे की माझ्या विरोधात कोठेही तक्रार करा माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही म्हणून तो महिला ग्रामस्थांना दमबाजी करत आहे तेव्हा मा.पोलिस निरीक्षक अंमळनेर यांना पोस्टा द्वारे निवेदन पाठऊन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे आमच्या गावातील अवैध दारू विक्री बंद करून या गावगुंडाचा ताबोडतोप बंदोबस्त करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रतिलिपी मा. पोलिस उपविभागीय अधिकारी आष्टी .मा. पोलिस अधिक्षक बीड यांना पोस्टा द्वारे पाठवण्यात आल्या आहेत या निवेदनावर विजयाबाई बाबासाहेब शेंडे, सुमनबाई भगवान शेंडे,कमला दत्ताजय शेंडे, द्वारका गोरक्ष जाधव,अनिता रावसाहेब शेंडे,संगिता राजेंद्र जाधव,कौशल्या विष्णु शेंडे,स्वाती कैलास जाधव ,रेखा शेंडे सह सताविस महिला ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
stay connected