जागतिक तापमान वाढ विषयी गांभीर्य आहे का ?

  जागतिक तापमान वाढ विषयी गांभीर्य आहे का ?




जागतिक तापमान वाढीबद्दल सगळ्यांनाच वरवर कल्पना, गांभीर्य आहे. मात्र आजच्या परिस्थितीचा विचार केला तर पृथ्वी तलावरील बुद्धीमान समजल्या जाणाऱ्या मानवाने या जागतिक तापमान वाढीबद्दल जागरूक राहून वेळीच  गांभीर्याने घेणे ही काळाची गरज झाली आहे. रोजच वृत्तपत्रात जागतिक तापमान वाढ अर्थात 'ग्लोबल वॉर्मिंग' याविषयी काहीतरी वाचत असतो, जागतिक स्तरावरील तापमानवाढ विषयी मात्र हे सगळे वाचूनही या सगळ्यावर आपण दुर्लक्ष करतो ? मात्र पृथ्वी दिवसेंदिवस जळत आहे, आणि यामुळे मानवी जीवन एक दिवस पूर्णपणे नष्ट होणार आहे असा विचार केला तर या समस्येची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. मानवाला प्रगतीच्या पायऱ्या चढवणारी वाढती औद्योगिक क्रांती आणि वाढत चाललेल्या नैसर्गिक मानवाच्या हस्तक्षेपामुळे एक दिवस बुद्धिमान समजणाऱ्या मानव जातीचाच घात करणार , याची कल्पना आपल्याला यायला हवी ?
कधी अतिवृष्टी,कधी दुष्काळजन्य परिस्थिती,कुठं नदीला आलेला भयावह पूर तर कधी तापून टाकणारे कडकडीत ऊन,तर कधी गोठवून टाकणारी थंडी तर अचानक आलेली चक्रीवादळ काही ना काही विचित्रच ? घडताना दिसत आहे याचे कारण निसर्गाचे चक्र विस्कळीत होत आहे, हे सर्वांनी समोर प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह ? उभे करत आहे.ग्लोबल वार्मिंग, क्लायमेट चेंज वातावरणात झालेले बदल यासारखे एक ना अनेक कारणे त्यामागे आहेत म्हणून हे बिघडलेलं निसर्गाचं चक्र पूर्वपदावर आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या योजना यातील प्रमुख उपाय म्हणजे 'ग्रीन कव्हर'!
उन्हात पाऊस, पावसाळ्यात कडक ऊन,हिवाळ्यात उष्णता हे आपण जाणवत असतानाच भारतात निसर्गाच्या चक्रात बदल होत आहेत, आता तर कधी पाऊस आणि कधी काय होईल हे सांगता न येणार ऋतू बदलाला सर्वांनी वेळीच गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे, गेल्या काही वर्षापासून तापमानातील झपाटाने होत चाललेले बदल त्याने अति उच्चांक गाठायला सुरुवात केली असून अधिक व त्याहुनही अधिक अंश सेल्सिअस तापमान पार करताना हे चित्र दिसत आहे हे चिंताजनक आहे. येणाऱ्या काळात देशभरातील सरासरीपेक्षा जास्त असलेले असेही अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवले असून थंडी , ऊन आणि पाऊस या भारतातील तिन्ही ऋतूचे वेळापत्रक गेल्या काही दशकापासून बदलत चाललेले आहे, त्याचा परिणाम आपल्याबरोबरच सर्व घटकावर होताना दिसत असून ही वेळीच गांभीर्याने घेत प्रत्येक नागरिकांनी करते म्हणून कार्य करणे आज काळाची गरज होत चालली आहे.
औद्योगीकरण, नागरिकरण, नवनवीन तंत्रज्ञान, लोकसंख्या वाढ, वाढती वृक्षतोड, महायुद्धे, रासायनिक खते,कीटकनाशके, अणुबॉम्ब चाचण्या, ऋतूचे वाढते तापमान आदि अनेक कारणामुळे पर्यावरणाच्या परिसंस्थेमध्ये भूप्रदूषण, जल प्रदूषण ,वायू प्रदूषण याचे प्रचंड वाढलेले प्रमाण दिसत असून, याचा गांभीर्यपूर्वक परिणाम मानवाच्या आणि पर्यावरणाच्या अस्तित्वावर होत असून पर्यावरणाबरोबरच मानवीय संतुलन बिघडत चाललेले दिसत आहे. पर्यावरणातील या मोठ्या बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले असून जागतिक स्तरावर अभ्यास करून सोडवणे, भविष्यासाठी गरजेचे आहे.
एका वर्षात अवर्षण,अतीवृष्टी व अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त होत चाललेले समाजजीवन स्थिर करण्याचे प्रचंड आव्हान पुढे असताना हवामान बदलाचा धोका सबंध पृथ्वीतीला सारखाच आहे, म्हणून यात वेळीच  सुधारण्याची जबाबदारी संबंध पृथ्वी वासियाची घेणे काळाची गरज आहे. कोणत्याही वस्तूंची निर्मिती करता वेळेस पर्यावरणी परिणामाचा विचार करूनच ते करणे गरजेचे असून वस्तूची निर्मिती जितकी पोषक तितकीच ते घातक ठरते, म्हणून सर्व परिणामाचा विचार करून त्याची निर्मिती करणे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल नाहीतर देणार का आपल्याला कधीच माफ करणार नाही हे निश्चित.जागतिक तापमान वाढ मर्यादेत ठेवण्यासाठी वेळ निघून चालली असून सध्याचे कार्बन उत्सर्जन बघता त्यातून मोठा धोका होऊ शकतो, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. वेळीच ही परिस्थिती लक्षात घेऊन सर्वांनी कर्तव्य म्हणून पाऊल उचलणे आज काळाची गरज बनली आहे, नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही येणाऱ्या संकटाला सर्वांना निश्चितच सामोरे जावे लागेल.

- राहुल मोरे
मो.न.९४०४१८११८१




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.