Happy Mother's Day: Mother's Day Special मातृदिनाच्या शुभेच्छा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मातृदिनाच्या शुभेच्छा
🌹आई🌹
Happy Mother's Day
चिमुकल्या पावलांनी मी
तुझ्या कुशीत यायची
प्रेमाणे मला जवळ घेत.
तू मायेने कुरवाळायची
रात्री चंद्राच्या प्रकाशात
अंगनात आपण बसायचो
सर्व शेजारी एकत्र येऊन
गाण्याच्या भेंड्या खेळायचो
माझा प्रत्येक हट्ट जेव्हा
तू पुर्ण तेव्हा करायची
माझी लाडकी लेक आहे
हे सगळ्यांना सांगायची
माझ्या काळजाचा तू्कडा
तू मला कायम म्हणायची
सोडुन जातांना मग मला
हदयाची घालमेल व्हायची
तुझ्या गोड आठवणी
हृदयात साठुन ठेवली
माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत
तुला हृदयात जपली
आई झाल्यावर कळली माया
लेकरांवर असते प्रेमाची छाया
तोपर्यंत नव्हती तुझी काया
फिरूनी नवे जन्मेन देवराया
नियतीने माझ्यावर अन्याय केला
मायेचा बंध का रे तोडी
आजही प्रेमासाठी भुकेली मी
कधीपरतुन येशील ग आई
😔😔😔😔😔😔😔😔
सुप्रिया सुरेश झिंजुर्डे नेवासा 9960470125
stay connected